शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये भाजपाची मोठी मोहीम, अमित शाह करणार रोड शो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 17:56 IST

केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  (आरएसएस) पदाधिकारी एस.राजेश यांच्या हत्येनंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उफाळून आलेला आक्रोश पाहता भाजपाने केरळमध्ये एक मोठा रोड शो करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिरुअनंतपुरम, दि. 12 - केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  (आरएसएस) पदाधिकारी एस.राजेश यांच्या हत्येनंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उफाळून आलेला आक्रोश पाहता भाजपाने केरळमध्ये एक मोठा रोड शो करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्नूरपासून तिरुअनंतपुरमरर्यंत जवळपास 500 किलोमीटर रोड शोची सुरुवात व शेवट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह करणार आहेत. 

या रोड शोच्या माध्यमातून भाजपा राज्यातील मुख्य विरोधी पक्ष सीपीएमला आक्रमक स्वरुपात राजकीय उत्तर देऊ इच्छिते. विशेष म्हणजे राज्यात सीपीएम आणि भाजपा-आरएसएसमध्ये ब-याच कालावधीपासून हिंसात्मक शत्रूत्व निभावले जात आहे. यावर भाजपाने असा आरोप केला आहे की, सीपीएमच्या नेतृत्वात असलेले सरकार सत्तेत आल्यापासून भाजपा-आरएसएस कार्यकर्त्यांवर वारंवार हल्ले होत आहेत आणि त्यांची हत्याही केली जात आहे. 

भाजपामधील सूत्रांनी सांगितले की,  ओणमनंतर सप्टेंबर महिन्यातील दुस-या आठवड्यात कन्नूरमधून मेगा रोड शोची सुरुवात होईल. जवळपास एक आठवड्यापर्यंत चालणारा हा रोड शो राज्यातील 10 जिल्ह्यातून होऊन तिरुअनंतपुरममध्ये पोहोचणार. भाजपा या रोड शोकडे फार गांभीर्यानं पाहत आहे. आठवडाभर चालणा-या या रोडशोमध्ये भाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्री आणि पक्षातील ज्येष्ठ नेते या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. भाजपातील नेत्यांचे असे म्हणणे आहे की, राज्यात भाजपाची पकड मजबूत होत असल्याचे सीपीएम नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भीती पसरवण्याच्या उद्देशाने  आरएसएस आणि भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात येत आहे. जेणेकरुन राज्यात भाजपाला आपला जम बसवण्याची संधी मिळू नये.

भाजपा नेत्यांचे असेही म्हणणे आहे की, राज्यात गेल्या वर्षभरात भाजपा व आरएसएसमधील एक डझनहून अधिक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. हत्या करणा-यांना राज्य सरकारचं संरक्षण आहे यामुळे त्यांची जामीनावर सुटका होत आहे आणि बाहेर येऊन ते पुन्हा साक्षीदारांना धमकावतात.  भाजपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता केरळमध्ये भाजपाची व्हॉटबँक वाढवण्याचे टार्गेट आहे त्यामुळे पक्ष या मोठ्या मोहीमेची सुरुवात करत आहे.