शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

टाइम्स नाऊच्या ओपिनियन पोलमध्येही भाजपाची बल्ले बल्ले! बंपर विजयाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 23:21 IST

गुजरात निवडणुकीच्या करण्यात आलेल्या अजून एका सर्व्हेमध्ये भाजपाच्या मोठ्या विजयाचे  भाकीत करण्यात आले आहे. इंग्रजीतील आघाडीची वृत्तवाहिनी असलेल्या टाइम्स नाऊने घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये

नवी दिल्ली - गुजरात निवडणुकीच्या करण्यात आलेल्या अजून एका सर्व्हेमध्ये भाजपाच्या मोठ्या विजयाचे  भाकीत करण्यात आले आहे. इंग्रजीतील आघाडीची वृत्तवाहिनी असलेल्या टाइम्स नाऊने घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये गुजरतमध्ये भाजपाला दोन तृतियांश बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कलचाचणी नुसार राज्यात दीर्घकाळापासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसच्या परिस्थितीत फार बदल होणार नाही. याआधी इंडिया टुडे- आज तकच्या सर्वेमध्येही भाजपाच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली होती. टाइम्स नाऊ-व्हीव्हीआरने केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपाला गुजरातच्या 182 सदस्य असलेल्या विधानसभेत 118 ते 134 जागा मिळतील. तर काँग्रेसला 49 ते 61 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इतर पक्षांना तीन जागा मिळू शकतात. गुजरात निवडणुकीत भाजपाला 52 टक्के, काँग्रेसला 37 टक्के तर अन्य पक्षांना 11 टक्के मते मिळतील. गुजरातमध्ये अँटी इन्कम्बन्सीचा प्रभाव जाणवत नसल्याचे भाजपाच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.  सत्ताधारी भाजपाविरुद्ध वारे वाहत असल्याने गुजरातच्या विधानसभा निवडुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच राहुल गांधी यांच्या झंझावाती प्रचारसभा आणि हार्दिक पटेलसह इतर नेत्यांचा काँग्रेसला मिळत असलेला पाठिंबा यामुळे ही निवडणूक भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अवघड जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र आज प्रसिद्ध झालेल्या टाइम्स नाऊच्या सर्व्हेत तसेच काल प्रसिद्ध झालेल्या  आज तक-इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपा सरकारच सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  आज तक-इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये 182 सदस्य असलेल्या गुजरातच्या विधानसभेमध्ये भाजपाला 115 ते 125 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर काँग्रेसला केवळ 57 ते 65 जागा मिळतील, असे या सर्वेत नमूद करण्यात आले होते.बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर बुधवारी जाहीर झाला आहे. दोन टप्प्यांमध्ये गुजरातमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबर तर दुस-या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होईल. 18 डिसेंबरला मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी तर, दुस-या टप्प्यात 14 जिल्ह्यातील 93 जागांसाठी मतदान होईल.  गुजरातमध्ये एकूण 4 कोटी 33 लाख मतदार असून  मतदानासाठी 50,128 मतदान केंद्रे उभारण्यात येतील. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना पहिले प्राधान्य मिळेल असे निवडणूक आयुक्त अचलकुमार जोती यांनी सांगितले. गुजरातमध्ये आदर्श अंचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. मतदानानंतर मतदाराला फ्लॅश लाईट दाखवणार तसेच उमेदवाराची सर्व माहिती सुद्धा दाखवली जाईल असे निवडणूक आयोगाने सांगितले. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017GujaratगुजरातBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस