शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींना जोडण्याचा भाजपचा प्रयत्न, मंगळवारी होणार खासदारांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 10:57 IST

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह देशात १२ पेक्षा अधिक राज्ये अशी आहेत, जेथे ओबीसींची संख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे किंवा तेथे निर्णायक मते ओबीसींची आहेत, असेच म्हणावे लागेल.

- संजय शर्मा

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस व विरोधकांच्या हल्ल्यापासून निपटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टी मागास वर्गाच्या अपमानाचे कार्ड खेळत आहेत. २८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात भाजपच्या सर्व ओबीसी खासदारांची बैठक बोलावली आहे.

राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द झाल्याच्या मुद्द्यावरील काँग्रेस पक्ष व विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून भाजप नेत्यांनी काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत विचारमंथन केले. त्यानंतर संपूर्ण प्रकरण ओबीसींचा अपमान, मागास वर्गाच्या सन्मानाच्या मुद्द्याशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ओबीसी वर्गात हा संदेश देण्यात येणार आहे की, नरेंद्र मोदी त्यांच्यातील व्यक्ती आहेत.

मोदींवरील हल्ला हा मागास वर्गाच्या जातींवरचा हल्ला आहे. ओबीसींच्या निमित्ताने देशातील अर्धी लोकसंख्या थेट नरेंद्र मोदींना जोडण्याचा यानिमित्ताने प्रयत्न केला जाणार आहे. राहुल गांधींच्या निमित्ताने का होईना भाजपने २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर यानिमित्ताने नजर ठेवली आहे. त्यानंतर आज दिवसभर भाजपच्या मागास वर्गाच्या नेत्यांची वक्तव्ये आली व राहुल गांधी यांनी आपल्या वकत्व्यावरून देशातील सर्व ओबीसींची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. 

देशभरात कार्यक्रमदेशातील एकूण मतदारांच्या ५५ टक्क्यांपेक्षा जास्त ओबीसी मतदार आहेत. काही राज्यांत तर ७० टक्के लोकसंख्या ओबीसी आहे. राहुल गांधींच्या निमित्ताने या सर्वांत मोठ्या ओबीसी लोकसंख्येला जोडण्याचे भाजप व नरेंद्र मोदींचे लक्ष्य आहे. याचमुळे भाजप ओबीसी नेत्यांचे देशभरात कार्यक्रम आयोजित करीत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह देशात १२ पेक्षा अधिक राज्ये अशी आहेत, जेथे ओबीसींची संख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे किंवा तेथे निर्णायक मते ओबीसींची आहेत, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :BJPभाजपा