शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 07:13 IST

‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर भाजपचा विश्वास

हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: समान नागरी संहिता (यूसीसी) आणि ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे भाजपचे दोन अजेंडे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यावर गांभीर्याने चर्चा सुरू असून सकारात्मक गोष्टी घडत आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले.

भाजपच्या ४७व्या स्थापना दिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून केलेल्या भाषणात ते म्हणाले की, महिलांना आरक्षण देण्याचा मुद्दा प्रथम भाजपनेच १९९४ साली मांडला होता. सध्याचे भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा महिला आरक्षण कायदा २०२९च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लागू करण्यासाठी  कटिबद्ध आहे. दडपशाहीसारख्या प्रसंगांना भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळात तोंड दिले. 

‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर भाजपचा विश्वास

पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की अगदी युद्धाच्या काळातही भाजप “वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वावर विश्वास ठेवते. पूर्वी प्रत्येक देशापासून समान अंतर राखल्याबद्दल भारताला गर्व वाटायचा, पण आता भारत प्रत्येक देशासोबत उत्तम संबंध राखून आहे व पुढे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  देशाच्या हितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करणारा ही एकमेव आघाडी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : UCC, One Nation-One Election: Modi Says BJP Agendas Still Incomplete

Web Summary : PM Modi stated that the Uniform Civil Code and 'One Nation, One Election' are ongoing BJP agendas. He highlighted the party's commitment to women's reservation and its belief in 'Vasudhaiva Kutumbakam,' even amidst global conflicts, prioritizing national interest and public welfare.
टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी