शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री केजरीवालांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात भाजप युथचे निदर्शन, तेजस्वी सूर्या यांना घेण्यात आलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 16:09 IST

या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः तेजस्वी सूर्या हेच करत होते. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि पाण्याच्या फवाऱ्यांचाही वापर केला. मात्र, आंदोलक बॅरिकेड्स तोडून पुढे गेले. वॉटर कॅनन चालवल्यानंतर कार्यकर्त्ये रस्त्यावर बसले.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटावर केलेल्या भाषणाविरोधात आज भाजप निदर्शने करत आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांना ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाच्या सुमारे 40 ते 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री निवासस्थानाकडून लेखी तक्रार आल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करतील.

या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः तेजस्वी सूर्या हेच करत होते. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि पाण्याच्या फवाऱ्यांचाही वापर केला. मात्र, आंदोलक बॅरिकेड्स तोडून पुढे गेले. वॉटर कॅनन चालवल्यानंतर कार्यकर्त्ये रस्त्यावर बसले.

यासंदर्भात, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करून निदर्शकांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिक्योरिटी बॅरियर्स तोडले. गेटवरील बूम बॅरिअरही तोजण्यात आले आहेत. भाजपचे गुंड सीएम केजरीवाल यांच्या घराची तोडफोड करत आहेत. भाजपच्या पोलिसांनी त्यांना रोखण्याऐवजी घराच्या दारवाजापर्यंत आणले.

काय म्हणाले होते केजरीवाल -'द काश्मीर फाइल्स' चित्रपट दिल्लीत टॅक्सफ्री करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. यावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले होते, तर मग तो चित्रपट युट्यूबवर टाका, म्हणजे सर्वच लोक मोफत बघतील. एवढेच नाही, तर काश्मिरी पंडितांच्या नावावर काही लोक कोट्यवधींची कमाई करत आहेत. तसेच, भाजप नेत्यांना पोस्टर लावण्याचे काम देण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाdelhiदिल्लीAAPआप