शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला; भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी कपडे फाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 16:26 IST

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांची अग्निवेश यांच्याविरोधात घोषणाबाजी

रांची: झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात स्वामी अग्निवेश यांना भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वामी अग्निवेश यांच्या दौऱ्याचा निषेध सुरू असताना हा प्रकार घडला. यावेळी कार्यकर्त्यांनी 'अग्निवेश गो बॅक' अशा घोषणा दिल्या. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला काळे झेंडे दाखवून अग्निवेश यांचा निषेध केला. मात्र काही वेळातच कार्यकर्त्यांनी अग्निवेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी अग्निवेश यांना धक्काबुक्की करुन जमिनीवर पाडलं. यानंतर त्यांचे कपडे फाडले आणि पगडीदेखील काढली. यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम', 'अग्निवेश भारत छोडो', अशा घोषणा दिल्या. 

स्वामी अग्निनेश आज पाकुड जिल्ह्यातील लिट्टिपाडा येथे एका सभेला संबोधित करणार होते. भारतीय आदिवासी विकास समितीनं या सभेचं आयोजन केलं होतं. या सभेआधी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेतील त्यांच्या विधानानं भाजयुमोचे कार्यकर्ते नाराज झाले. अग्निवेश पत्रकारांना संबोधित करुन हॉटेलबाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. याआधी अग्निवेश पाकुड जिल्ह्यात दाखल होताच त्यांना संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या निषेधाचा सामना करावा लागला होता. 

टॅग्स :BJPभाजपा