शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भाजपा १६० वर जाणार नाही : दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 05:55 IST

यूपीमध्ये सपा, बसपा व रालोद यांची आघाडी आहे. त्यात काँग्रेसचा समावेश झाल्यास भाजपाला १५ जागांवर समाधान मानावे लागेल. बिहारमध्ये राजद व काँग्रेसची आघाडी भाजपा जद(यू)ला जोरदार लढत देईल.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : देशाच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती हे उत्तर प्रदेश व बिहारमधल्या १२० जागा ठरवतात. भाजपा व अपना दलाला २०१४ साली उत्तर प्रदेशात ७३, तर बिहारमध्ये एनडीएला ३१ जागा म्हणजे एकूण १२० पैकी १०४ जागा मिळाल्या. आता ही स्थिती कायम राहणार नाही हे भाजपाही मान्य करते. यूपीमध्ये सपा, बसपा व रालोद यांची आघाडी आहे. त्यात काँग्रेसचा समावेश झाल्यास भाजपाला १५ जागांवर समाधान मानावे लागेल. बिहारमध्ये राजद व काँग्रेसची आघाडी भाजपा जद(यू)ला जोरदार लढत देईल. काश्मीर, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, झारखंड, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतही भाजपाच्या जागा घटणारच आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले.‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्ष केंद्रीय सत्तेबरोबर राहतात. प.बंगाल, ओडिशा व दक्षिण भारतातल्या ४ राज्यांत भाजपाचे स्थान नगण्य आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला १६० ते १७० च्या आसपास व काँग्रेसला १०० हून अधिक जागा मिळतील, असा सर्वांचाच अंदाज आहे. काँग्रेसच्या जागा १०० पेक्षा किती वाढतील याचे आज भाकीत करणे कठीण आहे. मोदी व शहांना सर्वाधिक भीती काँग्रेस व राहुल गांधींची वाटते हे मात्र स्पष्ट आहे.देशाला अन् भाजपमध्येही अनेकांना मोदी नको आहेत. पद अन् सत्तेसाठी मोदी कोणत्या थराला जातील, याचा नेम नाही. देशात धार्मिक व जातीय विद्वेषाची बीजे तर पेरलीच आहेत. त्याचा भडका उडवण्याचा प्रयत्न निवडणुकीपूर्वी होईल.पाकिस्तानच्या विरोधातही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे; पण रिझर्व बँक, नीती आयोग या घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा मोदींनी धुळीला मिळवली आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे लघु उद्योग, लहान व्यापारी व शेतकऱ्यांची सरकारने पिळवणूक केली. देशात सर्वत्र असंतोषाचा भडका उडण्याची कारणे अनेक आहेत.स्वस्थ बसून चालणार नाहीडिजिटल इंडियाचा जगभर गाजावाजा सुरू असताना, इतकी साधी मागणी निवडणूक आयोग पूर्ण करू शकत नसेल, तर स्वाभाविकपणे आगामी निवडणुकीबाबतच अनेक शंका उत्पन्न होतात. आयोगाच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नाही. मात्र, रास्त शंकांचे योग्यप्रकारे निरसन होत नाही, तोपर्यंत विरोधी पक्षांनीही स्वस्थ बसून चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंह