शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

धक्कादायक! राजस्थानातील 100 विद्यमान आमदारांचे भाजपा पंख छाटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 04:35 IST

राज्य सरकार आणि स्थानिक आमदारांविषयी लोकांमध्ये असलेल्या रागाचा फटका बसू नये, यासाठी भाजपने राजस्थानात किमान ८० ते १०० नव्या उमेदवारांना संधी देण्याचे ठरविल्याचे समजते.

नवी दिल्ली : राज्य सरकार आणि स्थानिक आमदारांविषयी लोकांमध्ये असलेल्या रागाचा फटका बसू नये, यासाठी भाजपने राजस्थानात किमान ८० ते १०० नव्या उमेदवारांना संधी देण्याचे ठरविल्याचे समजते. म्हणजेच विद्यमान ८० ते १०० आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे.दोनच दिवसांपूर्वी भाजपचे नेते व मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाजपच्या यादीत तुम्हाला काही तरी वेगळे पाहायला मिळेल, त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल, असे वक्तव्य केले होते. प्रकाश जावडेकर यांच्याकडे भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर दोनच दिवसांत भाजप राजस्थानात ८० ते १०० नवे चेहरे देणार असल्याचे उघड झाले आहे.यंदा भाजपसाठी राजस्थानची विधानसभा निवडणूक अतिशय अवघड मानली जात आहे. विविध सर्वेक्षणातून यंदा भाजपला बहुमत मिळणार नाही आणि काँग्रेसला अधिक संधी आहे, असेच निष्कर्ष आले आहेत. राज्यातील गुज्जर व जाट हे आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री वसुंधरा राजे सरकारवर संतप्त आहेत. दुसरीकडे वसुधंरा राजे यांच्या कार्यपद्धतीविषयी आमदार व मंत्र्यांमध्येही नाराजीचे वातावरण आहे. त्या अद्याप स्वत:ला राणीसाहेब समजून काम करतात, वागतात, अशा अनेक तक्रारी आहेत.हे एकीकडे आहे, तर दुसरीकडे अनेक आमदारांविषयी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यांनी स्वत:हून प्रत्येक आमदाराच्या कामाचा त्यांच्या अ‍ॅपद्वारे डेटा गोळा केला आहे. त्यातून आमदाराची विधानसभेतील आणि मतदारसंघातील कामगिरी, त्याच्यावरील आरोप, त्याने केलेली कामे, त्याचे वागणे ही सारी माहिती त्यांच्याकडे आणि पर्यायाने पक्षाकडे आलेली आहे. त्याआधारेच ८० ते १०० आमदारांचा पत्ता कट होईल, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. >यंदा सत्त्वपरीक्षागेल्या विधानसभेत २०० पैकी १६० जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. काँग्रेसने २५ जागांवर विजय मिळवला होता आणि अन्य पक्ष व अपक्ष मिळून १५ जागांवर विजयी झाले होते. इतके स्पष्ट बहुमत पाच वर्षांपूर्वी मिळालेल्या भाजपला यंदाची निवडणूक खरोखरच अवघड वाटत आहे. मध्यप्रदेशातील ६० ते ७० विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्याचेही भाजपने ठरविले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक