भाजपाला आता नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा गेली चार वर्षे या पदावर होते. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षापूर्वीच संपला आहे. पण, लोकसभा निवडणुकांसाठी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. दरम्यान, आता लवकरच भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत. दरम्यान, आता पक्षातील नियुक्त्यांसाठी हालचाल वाढली आहे. संक्रांतीनंतर भाजपला नवा अध्यक्ष मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत बैठका सुरू झाल्या असून लवकरच नावाला मंजुरी मिळू शकते. भूपेंद्र यादव, अनुराग सिंह ठाकूर, शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
महाकुंभमेळ्यासाठी 100 मीटर पाण्याखालीही ड्रोन; अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेमुळे जग होणार थक्क
सध्या पक्षाला १५ जानेवारीपर्यंत जिल्हा व प्रदेशाध्यक्ष करायचे आहेत. संक्रांतीपर्यंत किमान अर्ध्या राज्यांना नवे अध्यक्ष मिळतील आणि त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक होईल. महिनाअखेरीस पक्षाला नवा अध्यक्ष मिळू शकतो. रविवारी भाजपने मुख्यालयात यासंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष व्यतिरिक्त जेपी नड्डा यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संघटना पर्वाबाबतही चर्चा झाली. या अंतर्गत सभासदत्व अभियान राबविण्यात येत आहे.
या वर्षी ऑक्टोबरमध्ये भाजपने १० कोटी सदस्यांचा आकडा पार केला होता. रविवारी जेपी नड्डा आणि बीएल संतोष यांनी संघटना निवडणुकीचा आढावा घेतला. अटलबिहारी वाजपेयी यांची १०० वी जयंती वर्षभर साजरी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
अटलजींची जयंती वर्षभर सुशासन वर्ष म्हणून साजरी केली जाईल. सध्या संक्रांतीपर्यंत जिल्ह्याचे आणि राज्यांचे अध्यक्ष ठरवण्यावर पक्षाचा भर असेल. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल.