शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात भाजपाच सत्तेवर येईल, प्रकाश जावडेकर यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:40 IST

देशभरात भाजपाच्या बाजूने कौल मिळत आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीतही हा कौल दिसून आला, असे सांगतानाच कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपाच जिंकून सत्तेवर येईल

शीलेश शर्मा नवी दिल्ली : देशभरात भाजपाच्या बाजूने कौल मिळत आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीतही हा कौल दिसून आला, असे सांगतानाच कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपाच जिंकून सत्तेवर येईल, असा दावा मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. महाराष्ट्रात सरपंचाची निवड थेट करण्याची ही पहिली वेळ होती आणि त्यातही भाजपाला मोठे यश मिळाले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा पुढे आला आहे, असेही जावडेकर म्हणाले.‘लोकमत’समूहाचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांच्याशी जावडेकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थतीवर विस्तृत चर्चा केली. शास्त्री भवन येथील कार्यालयात झालेल्या या चर्चेत प्रकाश जावडेकर यांनी दावा केला की, कर्नाटकात दौरा केल्यानंतर ते या निष्कर्षाप्रत आले आहेत की, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा सत्तेवर येईल. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी जावडेकर यांनी सांगितले की, तेथील जनता भ्रष्टाचारामुळे त्रस्त आहे. त्यामुळे भाजपावरील लोकांचा विश्वास वाढत आहे. कर्नाटकचे प्रभारी असलेल्या जावडेकर यांनी दौºयातील अनुभवांच्या आधारे हे निष्क र्ष मांडले आहे.जीएसटीवरुन लोकांत नाराजी आहे काय? असा प्रश्न विजय दर्डा यांनी केला असता जावडेकर म्हणाले की, जीएसटीचे चांगले परिणाम समोर येत आहेत. अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी करांच्या बाबतीत जो दिलासा दिला आहे, त्याचे लोकांनी स्वागत केले आहे आणि लोक समाधानी आहेत.लोक आजही पंतप्रधान मोदी यांना पसंत करतात आणि त्यांच्या नावावर मत देतात, याचा पुनरुच्चार करून जावडेकर म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध त्यांनी जी मोहिम सुरु केली आहे त्याचे परिणाम समोर येत आहेत. रिटर्न फाइल करण्याच्या बाबतीत कर दात्यांच्या संख्येत मोठे परिवर्तन पहायला मिळतआहे. आगामी काळात याची कक्षा आणखी रुंदावेल आणि भ्रष्टाचारावर अंकुश बसेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.दत्तक गावावरून फिरकी -छिंदवाडामधील एक गाव आम्ही दत्तक घेतले आहे, असे सांगताना जावडेकर यांनी फिरकी घेत सांगितले की, कमलनाथ यांच्या मतदारसंघातील या गावात भरपूर विकास कामे केली जात असून, आम्ही हे गाव आणि कमलनाथ यांनाही दत्तक घेतले आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपा