शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

दिल्लीत दारुण पराभव...! AAP कार्यालयाचे दरवाजे आतून बंद केले गेले; कोणालाच 'प्रवेश' नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:39 IST

BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. सिसोदियांचा पराभव झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पद घेतलेल्या आतिशी यांनी काही तो विजय प्राप्त केला आहे. अशातच हा पराभव आपला सहन झालेला दिसत नसल्याचे त्यांच्या पक्ष मुख्यालयात चित्र दिसत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दारुण पराभव होताना दिसत आहे. सेनापती, मंत्री सारे गारद झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. सिसोदियांचा पराभव झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पद घेतलेल्या आतिशी यांनी काही तो विजय प्राप्त केला आहे. अशातच हा पराभव आपला सहन झालेला दिसत नसल्याचे त्यांच्या पक्ष मुख्यालयात चित्र दिसत आहे.

अण्णा हजारेंची दिल्ली निकालावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, केजरीवालांना या गोष्टीने बुडविले...

आपच्या मुख्यालयाचे मुख्य गेट आतून बंद करण्यात आले आहे. कोणालाच प्रवेश दिला जात नाहीय. या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेला देखील आतमध्ये घेतलेले नाहीय. तिला आतमध्ये घेण्यासाठी कार्यकर्ते फोनाफोनी करताना दिसत आहेत. सुरुवातीच्या कलांत आप मागे पडल्याचे दिसताच आपच्या कार्यालयात शुकशुकाट पसरलेला होता. आता केजरीवाल पराभवाच्या छायेत असल्याचे समजल्यानंतर गेटच बंद करून घेण्यात आले आहे.

आपच्या वरिष्ठ पातळीवरचे बहुतांश सर्व नेते पराभूत झाले आहेत. भाजपाच्या प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांना 3186 मतांनी पराभूत केले आहे. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून सुमारे ६०० मतांनी पराभूत झाले आहेत. राजेंद्र नगर मतदारसंघातून आपचे दुर्गेश पाठक यांचाही पराभव झाला आहे. 

मोठी बातमी! अरविंद केजरीवाल पराभूत; प्रवेश वर्मांनी कमाल केली, अमित शाह यांची भविष्यवाणी खरी ठरली

केजरीवालच कारण...

केजरीवाल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात साधेपणा आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हणून केली. मेट्रोने प्रवास करणे, स्वस्त गाडीने प्रवास करणे, सुरक्षा घेण्यास नकार देणे, या सर्व गोष्टींमुळे ते अन्य राजकारणी लोकांपेक्षा वेगळे ठरले होते. पण लवकरच ही प्रतिमा नाहीशी होऊ लागली. त्यांच्या ४० कोटी रुपयांच्या सरकारी बंगल्यावरील वादामुळे त्यांच्या साध्या राहणीमानाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. जनतेने त्यांना स्वतःचा नेता म्हणून निवडले होते पण त्यांची व्हीव्हीआयपी जीवनशैली पाहिल्यानंतर जनतेला स्वतःची फसवणूक झाल्याचे आढळले. त्यात दारु घोटाळ्यात तुरुंगात जाणे, भाजपविरोधात छोट्या छोट्या गोष्टींवरून राजकारण करत राहणे, या गोष्टींना जनता कंटाळली होती. याचाच परिणाम आपच्या आणि त्यांच्या पराभवात रुपांतरीत झाला. 

टॅग्स :AAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल