शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

२०२०, २०२५ मतदानाची टक्केवारी तेवढीच! पण त्या ७ टक्क्यांनी भाजपच्या ३९ जागा वाढविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:41 IST

BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपाने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ७ टक्के मते जास्त मिळविली आहेत. ही मतेच भाजपासाठी गेमचेंजर ठरली आहेत.

दिल्ली विधानसभेचे आकडे आता फायनल होत आले आहेत. ७० जागांपैकी भाजपा ४७ तर आप २३ जागांवर स्थिरावताना दिसत आहे. म्हणजेच भाजपाच्या ३९ जागा वाढल्या आहेत, तर आपच्या तेवढ्याच जागा कमी झाल्या आहेत. हा बदल केवळ ११ टक्के मते शिफ्ट झाल्याने झाला आहे. 

केजरीवालांनीच केजरीवालांना हरविले! आपच्या पराभवाची ही कारणे, त्यांचे वागणे, त्यांचे बोलणे...

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपाने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ७ टक्के मते जास्त मिळविली आहेत. ही मतेच भाजपासाठी गेमचेंजर ठरली आहेत. या निवडणुकीत भाजपाला ४५ टक्के मते मिळताना दिसत आहेत. २०२० मध्ये भाजपाला ३८.७ टक्के मते मिळाली होती. तर आपला २०२० मध्ये ५५ टक्के मते मिळाली होती. ही आपची मते अनेक कारणांमुळे भाजपा आणि काँग्रेस व इतरांकडे वळल्याचे दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत आपला ४३.६९ टक्के मिळताना दिसत आहेत. म्हणजेच आपची मते जवळपास १२ टक्क्यांनी कमी झाली आहेत. 

केजरीवालांनी ज्या आमदारांचे तिकीट कापले, त्यांनीच इंगा दाखवला? २८ नव्या उमेदवारांचे काय झाले?

आपची ७ टक्के मते भाजपाकडे वळली असली तरी उर्वरित मते ही काँग्रेसलाच मिळालेली नाहीत. तर इतर उमेदवारांनाही मिळाली आहेत. काँग्रेसला २०२० मध्ये ४.३ टक्के मते मिळाली होती. यंदा ६.४० टक्के मते मिळाली आहेत. इतरांना २०२० मध्ये २ टक्के मते होती, ती आता ४.२ टक्के झाली आहेत. दिल्लीत दोन्ही वेळेला ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. 

लोकसभेचे मतदान वेगळेच...हे विधानसभेचे असले तरी लोकसभेच्या सात जागांवर वेगळाच मतांचा पॅटर्न दिसला होता. लोकसभा निवडणुकीत या दिल्लीत ५४.७ टक्के मतदान झाले होते. काँग्रेस तीन जागांवर लढत होती. या मतांपैकी काँग्रेसच्या वाट्याला १९ टक्के मते तर पाच जागा लढणाऱ्या आपच्या वाट्याला २४.३ टक्के मते आली होती.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल