शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

Usha Thakur : "टंट्या मामाचं ताबीज करणार रक्षण, कोणताही आजार होईल बरा"; कोरोनात भाजपा मंत्र्यांचं अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 22:28 IST

BJP Usha Thakur : सांस्कृतिक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. तसेच त्यांनी रोगापासून संरक्षण होण्यासाठी लोकांना अजब सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,765 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 477 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क लावण्याचा, कोरोना नियमावलीचं पालन करण्याचा सल्ला आवर्जून दिला जात आहे. याच दरम्यान सांस्कृतिक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर (Usha Thakur) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. तसेच त्यांनी रोगापासून संरक्षण होण्यासाठी लोकांना अजब सल्ला दिला आहे. सध्या ठाकूर यांच्या विधानाचीच जोरदार चर्चा रंगली आहे. 

"टंट्या मामाचं ताबीज आपलं संरक्षण करेल. कोरोना काळात लाखोंची गर्दी एकत्र आली तरी मामाचं ताबीज असल्यामुळे कोणालाही काहीही होणार नाही, कोणताही आजार असेल तर तो देखील बरा होईल" असं विधान आता उषा ठाकूर यांनी केलं आहे. मध्यप्रदेशमध्ये टंट्या मामा भिल यांचा बलिदान दिवस दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. आदिवासी समाजातील लाखो बांधव यावेळी एकत्र येत असतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी आस्थेचं स्थान असलेल्या या उत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमू नये, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान उषा ठाकूर यांनी हे विधान केलं आहे. 

"मी हनुमान चालीसाचे पठण करते, हवन करते... हा माझा कोरोनापासून बचाव"

उषा ठाकूर यांनी याआधी देखील कोरोनाबाबत वादग्रस्त विधान केलेली आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी "मी हनुमान चालीसाचे पठण करते. मी रोज शंख फुंकते. काढा पिते. शेणाच्या गोवऱ्यांवर हवन करते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. हा माझा कोरोनापासून बचाव आहे" असं म्हटलं आहे. तसेच  मी गळ्यात गमछा ठेवते, जर कोणी जवळ आलं तर मी तो तोंडावर ठेवते. जगात ज्याला उत्तम मार्गाने जगायचे आहे त्याने वैदिक जीवनशैली अंगीकारली पाहिजे. त्याला कुठला आजार स्पर्शही करू शकत नाही" असं ठाकूर यांनी म्हटलं होतं. 

"...म्हणून प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत"

शिवराज सरकारमधील मंत्री आणि मध्य प्रदेशच्या महूच्या आमदार उषा ठाकूर या आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहेत. याआधी उषा ठाकूर यांनी संपूर्ण जगाला भगवं करण्याचं एक अजब सूत्र सांगितलं होतं. "सद्यस्थितीतील वाढते धोके पाहता प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे-अस्त्रे ठेवली पाहिजेत" असं ठाकूर यांनी म्हटलं होतं. तसेच "भगवा हा शांतीचं प्रतीक आहे. त्यामुळे जर संपूर्ण जग भगवं झालं तर सगळीकडे आनंदाचं आणि शांततेचं वातावरण असेल" असंही म्हटलं होतं. भोपाळमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी लोकांना संबोधित करताना ठाकूर यांनी वादग्रस्त विधानं केलं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा