शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा 'आनंदी' शेतकरी करतोय आंदोलन; आता भाजपलाच नोटीस पाठवणार

By कुणाल गवाणकर | Updated: December 23, 2020 08:57 IST

पंजाबमधील हरप्रीत सिंग गेल्या दोन आठवड्यांपासून सिंघू सीमेवर करताहेत आंदोलन

नवी दिल्ली: मोदी सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र नवे कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच असल्याच्या भूमिकेवर भारतीय जनता पक्ष ठाम आहे. भाजपकडून पंजाबमध्ये नव्या कायद्यांसंदर्भात जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली आहे. यामध्ये हरप्रीत सिंग नावाच्या एका शेतकऱ्याचा फोटो वापरण्यात आला आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे हरप्रीत सिंग आनंदी असल्याचं जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. मात्र हेच हरप्रीत सिंग गेल्या २ आठवड्यांपासून सिंघू सीमेवर नव्या कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत.हरप्रीत सिंग यांचा फोटो भाजपनं जाहिरातींमध्ये वापरला आहे. या जाहिरातीत नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फायदे होत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र भाजपनं आपला फोटो कोणत्याही परवानगीविना वापरला असल्याचा आक्षेप हरप्रीत यांनी नोंदवला. भाजपनं बेकायदेशीरपणे फोटो वापरल्याचा आरोप त्यांनी केला. हरप्रीत पंजाबच्या होशियारपूरचे रहिवासी असून ते शेतकरी आहेत. मात्र शेतीसोबतच ते अभिनयदेखील करतात.

भाजपनं संमतीशिवाय जाहिरातीत फोटो वापरल्यानं हरप्रीत यांनी नापसंती व्यक्ती केली. 'मी ६-७ वर्षांपूर्वी माझा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हाच फोटो भाजपनं जाहिरातीत वापरल्याचं मला काल काही मित्रांकडून समजलं. त्यांनी मला जाहिरातीचे फोटोदेखील पाठवले. मात्र माझा फोटो वापरण्यापूर्वी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. आता लोक मला फोन करून भाजपचा पोस्टर बॉय म्हणत आहेत. पण मी भाजपचा पोस्टर बॉय नसून शेतकऱ्यांचा पोस्टर बॉय आहे,' असं हरप्रीत म्हणाले.हरप्रीत गेल्या २ आठवड्यांपासून सिंघू सीमेवर आंदोलन करत आहेत. हरप्रीत आता भाजपच्या जाहिरातीसह स्वत:चा ओरिजनल फोटो भाजपला पाठवणार आहेत. यासोबत कायदेशीर नोटीसदेखील बजावण्यात येईल. भाजपनं हरप्रीत यांच्या फोटोसह नव्या कृषी कायद्यांचे फायदे सांगणाऱ्या जाहिराती तयार केल्या आहेत. जाहिरातीत हरप्रीत नांगर हाती घेऊन उभे आहेत. त्यांच्या शेजारी हमीभावाबद्दलच्या शंका दूर करणारा तपशील देण्यात आला आहे. 

टॅग्स :BJPभाजपा