शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात भाजपला बाप चालतो, मग मुलगा का नको? पोस्टरवर पर्रीकरांच्या छायाचित्राने मतदार संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 11:30 IST

उत्पल पर्रीकर यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे उमेदवारी मागितली होती; परंतु पक्षाने त्यांचा पत्ता कापून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली.

राजेश निस्ताने - पणजी : गेली पाच वर्षे राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचे राजकारण स्थानिक सामान्य मतदारांना समजेनासे झाले आहे. एकीकडे भाजपने माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या पोस्टर-बॅनर्सवर सर्रास मनोहर पर्रीकरांचे छायाचित्र वापरले जात आहे. उत्पल पर्रीकर यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे उमेदवारी मागितली होती; परंतु पक्षाने त्यांचा पत्ता कापून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उत्पल हे अपक्ष रिंगणात आहेत. बऱ्याच शहरी भाजप समर्थकांची त्यांना छुपी साथही लाभते आहे. उत्पल पर्रीकर विरुद्ध भाजप असा सामना या मतदारसंघात होण्याची चिन्हे आहेत. त्यावर गोव्यात भाजपला मनोहर पर्रीकर चालतात; परंतु त्यांचा मुलगा पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून का चालत नाही, असा सवाल सामान्य मतदारांमधून विचारला जातो आहे. 

उत्पलला शर्यतीबाहेर दाखविण्याचा प्रयत्नभाजपकडून उत्पल हे जणू रिंगणातच नाही असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. पणजी मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत असल्याचे बाबूश यांनी सांगून जणू उत्पल यांना बेदखल केले आहे.

देवेंद्र फडणवीसांवर नाराजीटॅक्सी चालक, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार व काही सामान्य मतदारांशी चर्चा केली असता भाजपने उत्पल पर्रीकरांचे तिकीट कापणे अनेकांना रुचलेले नसल्याचे जाणवले. गोवा भाजपचे केंद्रीय निरीक्षक देवेंद्र फडणवीस यांनी ‘नेत्याचा मुलगा हा तिकिटासाठीचा निकष होऊ शकत नाही’ असे सांगून उत्पल पर्रीकर यांचे तिकीट कापल्याने मतदारांमध्ये फडणवीसांबाबत नाराजी आहे.

गोव्यात शिवसेनेपुढे खाते उघडण्याचे आव्हान  महाराष्ट्रात गावखेड्यापर्यंत कार्यकर्ते आणि सध्या सत्तेत असलेल्या शिवसेनेला गेली २७ वर्षे प्रयत्न करूनही गोवा विधानसभेत खातेही उघडता आलेले नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून सेनेला एखादा तरी आमदार निवडून आणता येतो का, याकडे गोव्यासह महाराष्ट्राचेही लक्ष लागले आहे. गोवा हे मराठी भाषिकांचेही राज्य आहे. विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. 

 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Pramod Sawantप्रमोद सावंतNarendra Modiनरेंद्र मोदीManohar Parrikarमनोहर पर्रीकर