शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून राजकीय स्वार्थासाठी गृह मंत्रालयाचा वापर : तृणमूल काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 12:26 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही बंगामधील हिंसाचाराच्या घटना सुरूच आहे. या सर्व घटनांची केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीरपणे दखल घेतली आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील भाजप आणि तृणमूल काँग्रेसचा वाद देवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले पार्थ चटर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. भाजपकडून राजकीय स्वार्थासाठी गृह मंत्रालयाचा वापर केला जात असल्याचा खळबळजनक दावा चटर्जी यांनी केला आहे. पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये जेव्हा लहान मुलांना आणि यादव समुदायाचा लोकांना मारले गेले त्यावेळी भाजप नेते कुठे होते. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार घडवून , तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हत्याच्या घटना भाजपकडून घडवून आणल्या जात असल्याचा गंभीर आरोप चटर्जी यांनी केला आहे. भाजपकडून राजकीय स्वार्थासाठी गृह मंत्रालयाचा पुरेपूर वापर केला जात असल्याचे ही चटर्जी म्हणाले. दिल्लीत बसलेल्या भाजप नेत्यांना पश्चिम बंगालमधील परिस्थिती कळणार नाही असेही चटर्जी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही बंगामधील हिंसाचाराच्या घटना सुरूच आहे. या सर्व घटनांची केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीरपणे दखल घेतली आहे. तर दुसरीकडे आज पश्चिम बंगालमध्ये भाजप काळा दिवस पाळणार असून १२ तास बंदची  हाक देण्यात आली आहे.