शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपने नुपूर शर्मावर कारवाई केली, आता गोंधळ घालण्याची काय गरज?': नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:19 IST

''नुपूर शर्मावर भाजपने कारवाई केली आहे, तिच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पण, काहीजण जाणूनबुजून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत."

पाटणा: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे देशासह विदेशातही गदारोळ सुरू आहे. याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुपूर शर्मा यांचे समर्थन केले आहे. "भाजपने नुपूर शर्मावर कारवाई केली आहे, मग आता एवढा गदारोळ करण्याची काय गरज आहे?" असा प्रश्न त्यांनी विचारला.

माध्यमांशी संवाद साधताना नितीश कुमार म्हणाले, "नुपूर शर्मा यांच्यावर भाजपने आधीच कारवाई केली आहे. नुपूर शर्मावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. असे असूनही, हिंसक घटना होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. काही लोकांना जाणूनबुजून आपापसात भांडण लावायचे आहेत. कोणतीही गोष्ट नैसर्गिक होत नसते, त्यामागे कोणीतरी सूत्रधार असतो," असे ते म्हणाले.

'बिहारमध्ये कोणताही वाद नाही'नितीश कुमार पुढे म्हणाले की, देशभरात सुरू असलेल्या वादाचे बिहारमध्ये पडसाद नाहीत. बिहारमध्ये कोणत्याही वादाचे वातावरण नाही. रांची हिंसाचाराच्या वेळी बिहार सरकारचे मंत्री नितीन नवीन यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणात लक्ष घालण्याची आणि आवश्यक कारवाई करण्याची जबाबदारी झारखंड सरकारची आहे. बिहार सरकारने हा मुद्दा तातडीने झारखंड सरकारकडे मांडला आहे, असेही ते म्हणाले.

अनेक शहरांमध्ये हिंसाचारनुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद यांच्यावर वक्तव्य केले होते, यानंतर बराच वाद झाला. अरब देशांनीही नुपूरच्या वक्तव्याचा निषेध केला. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. मात्र, शुक्रवारी दिल्ली, रांची, लखनौ, प्रयागराज, कोलकाता येथे नूपूर शर्माविरोधात निदर्शने झाली. निदर्शनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचारही झाला. सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यात आली. रांची येथील हिंसाचारात 2 जणांचा मृत्यू झाला. दिल्लीतील जामा मशिदीसमोर घोषणाबाजी करण्यात आली. दुसरीकडे, यूपीच्या प्रयागराजमध्ये हिंसाचार उग्रपणे पसरला. येथे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारMosqueमशिद