शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदाराला 'डिस्को डान्स' पडला महागात, पार्टीतून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 11:14 IST

प्रणव सिंह चॅम्पियन आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

नवी दिल्ली : उत्तराखंडचे खानपूर मतदारसंघातील भाजपाचे आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांची पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्रणव सिंह चॅम्पियन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये प्रणव सिंह चॅम्पियन दारुच्या नशेत बंदुका घेऊन डान्स करताना दिसून आले. त्यांच्या या कृत्यामुळे भाजपाने त्याच्यावर हकालपट्टीची शुक्रवारी कारवाई केली. 

प्रणव सिंह चॅम्पियन आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ कोणत्या मारहाणीचा नव्हता, तर प्रणव सिंह चॅम्पियन आपल्या हातात बंदुका घेऊन दारुच्या नशेत डान्स करतानाचा होता. 

प्रणव सिंह चॅम्पियन यांनी आपल्या काही समर्थकांसोबत पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी 'लांबा लांबा घूंघट काहे को डाला ...' या गाण्यावर प्रणव सिंह चॅम्पियन एका हातात दारुचे ग्लास आणि एका हातात 4-4 बंदुका घेऊन डान्स करत आहे. त्यांच्या या पार्टीचा व्हिडीओ  सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने त्यांच्यावर मोठ्याप्रमाण टीका करण्यात येत होती. 

दरम्यान, प्रणव सिंह चॅम्पियन यांची वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देताना प्रणव सिंह चॅम्पियन दिसून आले होते. याप्रकरणी पत्रकाराकडून दिल्लीतील चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात प्रणव सिंह चॅम्पियन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पक्षाने प्रणव सिंह चॅम्पियन यांच्यावर जूनमध्ये तीन महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई केली होती.  

टॅग्स :BJPभाजपाSocial Viralसोशल व्हायरल