शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाजपाला झटका; पटेल समाजाचे नेते काँग्रेसच्या वाटेवर, नेत्याला १ कोटीची आॅफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 05:09 IST

अहमदाबाद : विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागली असतानाच गुजरातेत घोडाबाजार आणि नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रलोभने देण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.

अहमदाबाद : विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागली असतानाच गुजरातेत घोडाबाजार आणि नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रलोभने देण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. मात्र याचा भाजपाला चांगलाच फटका बसत आहे. आपल्याला भाजपात येण्यासाठी एक कोटीची आॅफर दिल्याचा आरोप पटेल समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला असतानाच निखिल सवानी या पटेल समाजाच्या नेत्याने भाजपा सोडणार असल्याचे जाहीर करून भाजपाला झटका जोरदार झटका दिला. आणखी दोन नेतेही काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.सवानी यांनी आपण भाजपामधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. आपण राहुल गांधी यांना भेटणार आहोत. त्यानंतर आपण आपली भूमिका व वाटचाल ठरवू, असे ते म्हणाले. नरेंद्र पटेल व सवानी हे दोघे हार्दिक पटेल यांचे समर्थक आहेत. काही दिवसांपूर्वीच सवानी भाजपामध्ये गेले होते.आपण नरेंद्र पटेल यांचे अभिनंदन करतो, असे सांगून सवानी म्हणाले की, एका गरीब कुटुंबातून आले असतानाही पटेल यांनी भाजपाची एक कोटीची आॅफर नाकारली, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. आपणास भाजपाने कोणतीही पैशांची आॅफर दिली नव्हती, हे स्पष्ट करतानाच ते म्हणाले की, आपणास केवळ आश्वासनांचा लॉलिपॉप भाजपाने दाखवला. मात्र पटेल समाजाच्या नेत्यांना फोडण्यासाठी भाजपाकडून पैशांची आॅफर दिली जात असल्याचे आपण ऐकून आहोत. (वृत्तसंस्था)नरेंद्र पटेल यांनी मला भाजपामध्ये प्रवेशासाठी १ कोटी रुपयांची आॅफर दिली होती आणि त्यापैकी १0 लाख रुपये रोख दिले होते, असे सांगताना ती रक्कमच पत्रकार परिषदेत सादर केली होती. उरलेले ९0 लाख सोमवारी देण्याचे मान्य करण्यात आले होते, असा आरोपही नरेंद्र पटेल यांनी केला होते. यावरून भाजपाचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. राहुल गांधी यांनीही गांधीनगरच्या सभेत ‘गुजरातचा आवाज’ विकत घेतला जाऊ शकत नसल्याचा टोला भाजपाला लगावला आहे.>दोघे काँग्रेसच्या वाटेवरओबीसी संघटनेचे नेते अल्पेश ठाकूर यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेतली. ते काँग्रेसमध्ये सहभागी होणार असून, ते विधानसभेची निवडणूक लढतील, असे सांगण्यात येते. जिग्नेश मेवाणी हे गुजरातमधील दलितांचे नेते असून, तेही काँग्रेसमध्ये सहभागी होतील आणि निवडणूक लढवतील, असे सांगण्यात येते.

टॅग्स :GujaratगुजरातBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस