शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवणार : भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 14:31 IST

पश्चिम बंगालच्या चंद्रकोण येथून ममता यांचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या होत्या.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत सर्वधिक चर्चेत आलेला पश्चिम बंगाल हे राज्य अजूनही राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू बनलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये 'जय श्री राम' ह्या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापत आहे. 'जय श्री राम'च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर मुख्यमंत्री ममता बनर्जी भडकल्या असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यांनतर भाजपच्या 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आले  होते. त्याला उत्तर देत भाजपकडून 'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवले जाणार असून त्याची तयारी सुरु झाली असल्याची माहिती भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी दिली.

पश्चिम बंगालमध्ये  'जय श्री राम'च्या घोषणांमुळे राजकीय युद्ध सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या चंद्रकोण येथून ममता यांचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली. त्या गाडीतून उतरून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या होत्या. यावेळी पोलिसांनी भाजपचे 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर भाजप ही आता आक्रमक झाली असून ममता बनर्जी यांना 10 लाख 'जय श्री राम' लिहलेले पोस्टकार्ड पाठवणार आहे. त्याची तयारी सुद्धा झाली असल्याचा खुलासा अर्जुन सिंह यांनी केला आहे. 

 

भाजप कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या म्हणून ममता बनर्जी ह्या पोलिसांचा उपयोग करून त्यांना अटक करत असतील तर त्यांना 'जय श्रीराम' लिहलेले पोस्टकार्ड पाठवून उत्तर दिले जाणार आहे. ममता बनर्जी यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे दिसतय. असे  म्हणत  खासदार अर्जुन सिंह यांनी ममतांवर टीका केली.