शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची ताकद पणाला! कर्नाटकात पंतप्रधानांसह १२ केंद्रीय मंत्री, ४ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 09:38 IST

दक्षिणेतील आपला एकमेव गड कर्नाटक वाचविण्यासाठी भाजपने आपल्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले आहे.

संजय शर्मानवी दिल्ली : दक्षिणेतील आपला एकमेव गड कर्नाटक वाचविण्यासाठी भाजपने आपल्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह १२ केंद्रीय मंत्री, चार मुख्यमंत्री व एका उपमुख्यमंत्र्यांना कर्नाटकमध्ये प्रचार दौरे करून संपूर्ण राज्य पिंजून काढण्यास सांगण्यात आले आहे. 

कर्नाटकात भाजपने पूर्ण ताकद पणाला लावण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री व पक्षाचे स्टार प्रचारक कर्नाटकच्या २२४ विधानसभा जागांवर प्रचार करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक आठवड्यात एकदा राज्याचा दौरा असेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आठवड्यातील दोन दिवस कर्नाटकात प्रचार करणार आहेत. यानंतर सर्वांत जास्त मागणी योगी आदित्यनाथ यांची आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रचारासाठी १० दिवसांचा वेळ मागण्यात आला आहे.

कोण मारणार बाजी?कर्नाटकातील मतदानपूर्व सर्व्हेक्षणातून काँग्रेसकडे सत्ता जाण्याचे संकेत मिळत आहेत. 

येडियुरप्पा यांच्यावर मदार

  • राजनाथ सिंह, नितीन गडकरी व पियूष गोयल यांनाही कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी वेळ मागण्यात आला आहे. 
  • योगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चौहान, प्रमोद सावंत व मनोहरलाल खट्टर हे चार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कर्नाटकात विविध विधानसभा मतदारसंघांत जाण्यास सांगण्यात आले आहे.
  • कर्नाटकातील २२४ विधानसभा जागांवर भाजपच्या स्टार प्रचारकांचे कार्यक्रम असावेत, अशी रणनीती आखली जात आहे. 
  • बी. एस. येडियुरप्पा यांची प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभा व्हावी, असेही नियोजन केले जात आहे. येडियुरप्पा हे राज्यातील लिंगायत समुदायाचे दिग्गज नेते मानले जातात. 

घोषणा पुढील आठवड्यात?विधानसभा निवडणुकांची अद्याप घोषणा झालेली नाही. पुढील आठवड्यात कधीही ही घोषणा होऊ शकते, हे लक्षात घेऊन भाजपने केंद्रीय नेत्यांचे दौरे कर्नाटकात आयोजित केले आहेत. 

काँग्रेसनेही आखली रणनीतीपूर्वोत्तर राज्यातील निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीत महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून रणनीती आखली जात आहे.  या सर्व राज्यात महिलांसाठी वेगळा जाहीरनामा जारी करण्याची तयारी सुरू आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महिलांसाठी कर्नाटकात मै नेता हूँ अभियान सुरू केले आहे. तसेच, महिलांना दोन हजार रुपये प्रति महिना देण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकNarendra Modiनरेंद्र मोदीB. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पा