शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

गुजरात निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 12:15 IST

Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमधील 160 विधानसभा जागांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी (Gujarat Assembly Election 2022) गुरुवारी भाजपने (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या पत्नीलाही भाजपने तिकीट दिले आहे. गुजरात निवडणुकीसाठी भाजपने राजकोट पश्चिममधून दर्शिता पारशा, कलवारमधून मेघजी भाई, पोरबंदरमधून बाबूभाई पोखरिया आणि जुनागडमधून संजय भाई यांना तिकीट दिले आहे. तर जितूभाई सोमाणी यांनाही भाजपचे तिकीट मिळाले आहे.

गुजरातमधील 160 विधानसभा जागांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने 14 महिला उमेदवार आणि 69 विद्यमान आमदारांना तिकीट दिले आहे. याशिवाय, भाजपने 13 अनुसूचित जाती आणि 14 अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना तिकीट दिले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे भाजपच्या तिकीटावर घाटलोडियातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्याचबरोबर, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी हे मजुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. तसेच, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले हार्दिक पटेल हे विरमगाममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

मोरबीचे तिकीट कोणाला मिळाले?भाजपने अबडासामधून प्रद्युम्नसिंग जडेजा, मांडवीमधून अनिरुद्ध भैलाल दवे, भुजमधून केशवलाल पटेल, अंजारमधून त्रिकमभाई बिजलभाई छांगा, गांधीधाममधून मालतीबेन माहेश्वरी, रापरमधून वीरेंद्रसिंह बहादूरसिंह जडेजा, दसाडामधून परषोत्तमभाई परमार, लिम्बडीमधून किरीटसिंह राणा, चोटीलामधून शामजीभाई चौहान, मोरबीमधून कांतीलाल अमृतिया, राजकोट पूर्वमधून उदयकुमार आणि राजकोट दक्षिणमधून रमेशभाई यांना तिकीट देण्यात आले आहे.

संजयभाई जुनागडमधून निवडणूक लढवणारराजकोट ग्रामीणमधून भानुबेन, जसदणमधून कुंवरजीभाई बावलिया, गोंडलमधून गीताबा, जेतपूरमधून जयेशभाई, कालावदमधून मेघजीभाई, जामनगर ग्रामीणमधून राघवजीभाई, जामनगर उत्तरमधून रिवाबा जडेजा, जामनगर दक्षिणमधून दिव्येश अकबरी, जामजोधपूरमधून चिमणभाई, द्वारकामधून पबुभा माणेक, जुणागढमधून संजयभाई, विसावदरमधून हर्षदभाई आणि केशोदमधून देवाभाई यांना भाजपचे तिकीट मिळाले आहे.

ऊनामधून काळूभाई राठोड यांना मिळाले तिकीटयाचबरोबर, भाजपने मांगरोलमधून भगवानजीभाई, सोमनाथमधून मानसिंग परमार, तलालामधून भगवानभाई बारड, कोडनारमधून प्रद्युम्न वाजा, ऊनामधून काळूभाई राठोड, धारीतून जयसुखभाई काकडिया, अमरेलीतून कौशिकभाई, लाठीतून जनकभाई, सावरकुंडमधून महेश कासवाला, राजूलामधून हीराभाई, महुवामधून शिवाभाई, तळाजामधून गौतमभाई, गारियाधरमधून केशुभाई, पालिताना भिखाभाई आणि भावनगर ग्रामीणमधून परषोत्तमभाई सोलंकी यांना तिकीट देण्यात आले आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रमगुजरातमधील विधानसभेच्या एकूण 182 जागांपैकी 89 जागांसाठी 1 डिसेंबरला आणि उर्वरित 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीची अधिसूचना अनुक्रमे 5 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबरला जारी करण्यात येणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख अनुक्रमे 14 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर असणार आहे.

याचबरोबर,  15 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 17 नोव्हेंबर (टप्पा पहिला) आणि 21 नोव्हेंबर (टप्पा दुसरा) ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकांसोबतच 2023 मध्ये होणाऱ्या अन्य काही राज्यांच्या निवडणुका 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाGujaratगुजरातGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022