शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

रॉबर्ट वाड्रावरुन भाजपाचा सोनिया-राहुल गांधींवर हल्ला, काँग्रेस म्हणतेय - करा कोणतीही चौकशी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 09:52 IST

भाजपानं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडत रॉबर्ट वाड्रा आणि शस्त्रास्त्रांचे व्यापारी संजय भंडारी यांच्या नातेसंबंधावरुन गांधी कुटुंबाच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली - भाजपानं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडत रॉबर्ट वाड्रा आणि शस्त्रास्त्रांचे व्यापारी संजय भंडारी यांच्या नातेसंबंधावरुन गांधी कुटुंबानी साधलेल्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 'टाइम्स नाऊ' वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, फरार असलेले शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारीनं 2012मध्ये परदेश दौ-यासाठी वाड्रांसाठी बिझनेस क्लासचं तिकीट बुक केले होते. दरम्यान, वाड्रा यांनी यावर अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले की, वाड्रा यांना गेल्या 41 महिन्यांपासून टार्गेट केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस अध्यक्षांच्या जावयाविरोधातील आरोपांसंदर्भात चुकीच्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी कोणतीही चौकशी करायची असल्यास त्यांनी करावी. दरम्यान, अनेकदा टार्गेट करुनही आतापर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन झाल्याचे कोणतेही निष्कर्ष काढले गेलेले नाहीत, असेही सुरजेवाला यांनी यावेळी म्हटले. 

काँग्रेसच्या मौनावर BJP चा सवालसंरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी वाड्रा मुद्यावरुन काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला. सीतारमण यांनी असे म्हटले की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी साधलेले मौन पाहता त्यांनी वाड्रांविरोधातील आरोप स्वीकारल्याचे मानले जात आहे. प्रसिद्ध माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांचा हवाला देत सीतारमण यांनी आरोप केला की, लंडनमधील वाड्रांच्या घरातील सामान-सुमान भंडारीनंच दिले आहे आणि त्यानंच वाड्रांच्या परदेश यात्रेची व्यवस्थाही केली. दरम्यान भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं असा दावादेखील केला आहे की, भंडारीच्या बँक खात्यात 7.5 लाख स्विस फ्रँक (चलन) जमा करण्यात आले होते. वाड्रा यांच्या घरातील सजावट-देखभालीवर करण्यात आलेल्या खर्चाचा काही संबंध आहे का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मीडिया रिपोर्टाचा उल्लेख करत संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी आरोप केला की, यादरम्यान कमीत-कमी तीन वेळा देवाणघेवाण करण्यात आली आणि हा प्रकार गंभीर आहे. यावर सोनिया गांधी,  राहुल गांधी यांच्यासहीत काँग्रेसनं का मौन साधलंय?,असा प्रश्नही सीतारमण यांनी यावेळी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्याकडून वारंवार करण्यात येणा-या ट्विटचा उल्लेख करत सीतारमण यांनी म्हटले की, या मुद्यार राहुल गांधींनी मौन का साधलं आहे?.  फेसबुकवर वाड्रांची पोस्टदरम्यान, वाड्रा यांनी आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र फेसबुकवर एक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. सुप्रभात, मी सक्षम आहे, माझा स्वतःवर विश्वास आहे. मी आपल्या स्वप्नांना योजनेत बदलू शकतो आणि आपल्या योजनांना प्रत्यक्षात आणू शकतो.   

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी