शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकसाठी भाजपची जोरदार तयारी; येडियुरप्पा, प्रधानांवर मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 06:54 IST

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका एप्रिलच्या अखेरीस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या राज्यात भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले.

संजय शर्मा -नवी दिल्ली : दक्षिण भारतातील राज्यांपैकी फक्त कर्नाटकमध्येच भाजपचे सरकार आहे. तिथे आगामी विधानसभा निवडणुकासाठी भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पक्षप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली तर या निवडणुकांच्या रणनीतीची सर्व सूत्रे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे सोपविली. कर्नाटकमध्ये पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजपने ही पावले उचलली आहेत.कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका एप्रिलच्या अखेरीस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या राज्यात भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले. मात्र ते आपल्या कामकाजातून जनतेवर प्रभाव पाडू शकले नाहीत. बोम्मई हे लिंगायत समाजाचे असल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविणे हे भाजपला अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे भाजपने बी. एस. येडियुरप्पा या अनुभवी नेत्याकडे कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांची सूत्रे सोपविली आहेत. तर या निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयासाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान प्रभारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतील, असे पक्षाला वाटते.

तिरंगी लढतीची शक्यताकाँग्रेसमध्ये डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनण्यासाठी स्पर्धा आहे. जनता दल सेक्यूलर हा पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजप, काँग्रेस, जनता दल सेक्यूलर यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 

हेलिकॉप्टर प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते उद्घाटनकर्नाटकमधील तुमकुरू येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) प्रकल्पात ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या सोमवारी उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पात हलक्या वजनाची हेलिकॉप्टर बनविली जातील. उज्ज्वला योजनेनंतर घरोघरी सौर चुली वितरित करण्याच्या योजनेचा तसेच प्लास्टिक बाटल्यांपासून कापड तयार करण्याच्या प्रकल्पाचे मोदी उद्घाटन करण्यात येईल. 

टॅग्स :BJPभाजपाKarnatakकर्नाटक