BJP : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला आहे. येत्या मे महिन्यात ही निवडणूक अपेक्षित होती. पण, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे सध्या देशात तणावाचे वातावरण आहे, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच निवडणुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
पहलगाम हल्ल्यानंतर निर्णयपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भाजपच्या संघटनात्मक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे जगत प्रकाश नड्डा अध्यक्षपदावर कायम राहतील.
नड्डा 2020 पासून अध्यक्षपद भूषवत आहेत2019 मध्ये अमित शाहा केंद्रीय मंत्री झाल्यानंतर जगत प्रकाश नड्डा यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर नड्डा यांना केंद्रीय आरोग्यमंत्रीपद मिळाले. त्यामुळे नड्डा पक्षाचे अध्यक्षपद सोडतील अशी चर्चा होती, परंतु पक्षांतर्गत निवडणुका न झाल्यामुळे ते अजूनही अध्यक्षपदी कायम आहेत. भाजपच्या राजकीय वर्तुळात नड्डा यांच्यानंतर नवे अध्यक्ष कोण असतील? याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. गेल्या 6 महिन्यांत भाजप अध्यक्षपदासाठी माध्यमांमध्ये अनेक नावांची चर्चा झाली आहे. परंतू, अंतिम निर्णय़ निवडणुकीनंतरच घेतला जाईल.