शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप विरोधकांचे ‘एकला चलो रे’? काँग्रेसकडून ऐक्यासाठी पुढाकार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 06:22 IST

काँग्रेस निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यात व्यग्र असून, इतर पक्ष ‘एकला चलो रे’ वागत असल्याने भाजपविरोधी पक्षांच्या संघटित विरोधाला सुरूंग लागताना दिसत आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली :काँग्रेस निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यात व्यग्र असून, इतर पक्ष ‘एकला चलो रे’ वागत असल्याने भाजपविरोधी पक्षांच्या संघटित विरोधाला सुरूंग लागताना दिसत आहे. वर्षअखेर दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु काँग्रेसने संसदेच्या शेवटच्या दिवशी विरोधकांसाठी पारंपरिक भोजन आयोजित केले नाही, ना विरोधकांच्या ऐक्यासाठी कोणता पुढाकार घेतला. 

काँग्रेस-भाजपेतर तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष, द्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती, जनता दल (एस) किंवा एवढेच काय डावे पक्षही संसदेत एक-एकटे राहिले. सपा व बसप तृणमूलसोबत काम करण्याच्या मानसिकतेत नाही. मार्क्सवादी पक्षाने काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब विजयानंतर आम आदमी पक्ष एकट्याने चालणार आहे. राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत काम करण्याची तयार असल्याचे संकेत दिले आहेत. 

प्रयत्न गेले वाया - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न त्यांच्यासोबत काम करण्याची इतर कोणा पक्षांची इच्छा नसल्यामुळे वाया गेले. - काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यांच्या शाखा (विशेषत: गुजरात आणि हिमाचल प्रदेश) बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही राज्यांत या वर्षअखेर विधानसभा निवडणूक होणार आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस