शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची अधिकृत वेबसाईट केली हॅक; मोदींविषयी झळकविला आक्षेपार्ह व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:45 IST

भारतीय जनता पक्षाची अधिकृत वेबसाईट मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता हॅक करण्यात आली.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची अधिकृत वेबसाईट मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता हॅक करण्यात आली. या कृत्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. भाजपाच्या वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्कर यांचा एक व्हिडीओ झळकविण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले. त्यानंतर काही वेळातच भाजपाच्या वेबसाईटच्या देखभालीचे काही काम सुरू असल्याने सध्या त्यावरील मजकूर पाहाता येणे शक्य नाही, असा अ‍ॅडमिनने दिलेला संदेश वेबसाईटवर क्लिक केल्यावर अनेकांना पाहायला मिळाला.भाजपाची वेबसाईट हॅक झाल्याचे टिष्ट्वट काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियाच्या प्रभारी दिव्या स्पंदना यांनीही केले. भाजपाची वेबसाईट हॅक झाल्यानंतर त्यावर एक आक्षेपार्ह व्हिडीओ दिसत होता. मात्र काही वेळानंतर ही वेबसाईट पूर्णपणे बंदच पडली. २६ डिसेंबर १९९५ रोजी भाजपाची ही अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली होती. १० आॅक्टोबर २०१८नंतर ही वेबसाईट अपडेट करण्यात आली नव्हती. तिच्यावर हॅकर्सचा हल्ला आजवर झालेला नव्हता मात्र छत्तीसगढ भाजपाची वेबसाईट २० फेब्रुवारी रोजी हॅक करण्यात आली होती.>सरकारी वेबसाईटवरही झाला होता सायबर हल्लागुजरात काँग्रेसची वेबसाईटही २१ फेब्रुवारी रोजी हॅक करून त्यावर आक्षेपार्ह गोष्टी झळकविण्यात आल्या होत्या. हे कृत्य भाजपाच्याच लोकांनी केले असावे असा आरोप त्यावेळी त्या राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केला होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात केंद्र सरकारच्या काही खात्यांच्या वेबसाईट एकाच वेळी बंद पडल्या होत्या. त्या वेबसाईटवर चिनी भाषेतील अक्षरे दिसत होती. त्यामुळे हे चिनी हॅकरचेच कृत्य असावे असा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. मात्र संगणकीय प्रणालींतील त्रुटींमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण सरकारने त्याबाबत केले होते. जानेवारी महिन्यातनॅशनल सिक्युरिटी गार्डची वेबसाईट पाकिस्तानातून हॅक करण्यात आली होती. २०१७ साली केंद्रीय गृह खात्याच्या वेबसाईटवरही सायबर हल्ला झाला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी