शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

भाजपाकडून काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला 15 कोटींची ऑफर; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 11:06 IST

भाजपने काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला पक्ष सोडण्यासाठी 15 कोटी रूपयांची ऑफऱ दिल्याचा आरोप यावेळी भाजपवर करण्यात आला.  

ठळक मुद्देभाजपने काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला पक्ष सोडण्यासाठी 15 कोटी रूपयांची ऑफऱ दिल्याचा आरोप यावेळी भाजपवर करण्यात आला.  आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये आणून ठेवलं आहे.गुजरात राज्यसभेची ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून मनी-मसल्स पावरचा वापर करून आमदारांना विकत घ्यायचे प्रयत्न सुरू होते.

बंगळुरू, दि. 31- गुजरातमध्ये ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविलं होतं. या आमदारांची त्या रेसॉर्टमध्ये रविवारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी काँग्रेसकडून भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले. भाजपने काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला पक्ष सोडण्यासाठी 15 कोटी रूपयांची ऑफऱ दिल्याचा आरोप यावेळी भाजपावर करण्यात आला.  

'भाजपाकडून काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला 15 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली. आमचे आमदार इथे मजा-मस्ती करण्यासाठी आलेले नाहीत, तर आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये आणून ठेवलं आहे. गुजरात राज्यसभेची ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून मनी-मसल्स पावरचा वापर करून आमदारांना विकत घ्यायचे प्रयत्न सुरू होते, असं काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि गुजरातचे आमदार शक्तीसिंह गोहिल म्हणाले आहेत. आम्ही एकमताने पक्षासोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला असून भाजपाला लोकशाहीचा अंत करू देणार नाही, असंही गोहिल म्हणाले आहेत. गुजरात काँग्रेसमधील गळती थांबविण्यासाठी काँग्रेसच्या 44 आमदारांना बंगळुरूतील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी 2 आमदार वैयक्तिक आणि राजकीय कारण सांगून गुजरामध्ये परत आले, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. दोन आमदार परत माघारी गेल्यानंतर राहिलेल्या 42 आमदारांना माध्यमांसमोर हजर करण्यात आलं. यावेळी या आमदारांनी काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना संपूर्ण पाठिंबा दर्शविला.

यावेळी गांधीनगरमधील दाहेगममधील आमदार कामिनीबेन बी राठोड यांनीही भाजपवर आरोप केलेय. मलाही भाजपने 15 कोटींची ऑफर दिली होती पण ती ऑफर नाकारल्याचं कामिनीबेन राठोड यांनी सांगितलं आहे. काँग्रेसचे नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवीत आहेत. पक्षाच्या ५७ पैकी ६ आमदारांनी राजीनामा दिल्याने संकट उभे ठाकलं आहे. 

पटेल जिंकणार नाहीत?राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्ष सोडला असतानाच काँग्रेसचे एक ज्येष्ठ आमदार आणि शंकरसिंह वाघेला यांचे निकटवर्तीय राघवजी पटेल यांनी म्हटलं , अहमद पटेल यांच्यासाठी निवडणूक जिंकणे कठीण आहे. येत्या काही दिवसांत काँग्रेसचे आणखी २० आमदार पक्ष सोडतील. राघवजी पटेल यांनीही आपण राजीनामा देऊन भाजपात सहभागी होणार असल्याचे सूचित केले. सात आमदारांच्या एका गटाने मात्र त्यांच्यासोबत बंगळुरूला न जाण्याचा निर्णय घेतला. यात वाघेला आणि त्यांचे पुत्र महेंद्रसिंह वाघेला यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आमदारांना तिथे हलविले आहे.

उत्तर प्रदेशात सपाच्या दोन, बसपाच्या एका आमदाराचा राजीनामाउत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीच्या दोन आणि बसपाच्या एका विधान परिषद सदस्याने शनिवारी राजीनामा दिला. सभापती रमेश यादव यांनी सांगितले की, सपाचे आमदार बुक्कल नवाब आणि यशपाल सिंह तसेच बसपाचे ठाकूर जयवीर सिंह यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी लखनौ दौºयावर असतानाच तीन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पाच मंत्री सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना विधानसभा वा परिषदेवर निवडून आणणे गरजेचे आहे. योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, दिनेश शर्मा स्वतंत्र देव सिंह आणि मोहसिन रझा हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.या घटनाक्रमामुळे आता योगी आदित्यनाथ यांना निवडणूक लढविण्याची गरज पडणार नाही. विधान परिषदेवर ते निवडून येऊ शकतील. अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली आहे. बसपाच्या प्रमुख मायावती म्हणाल्या की, भाजपाला सत्तेच्या रक्ताची चटक लागली आहे. मणिपूर, गोवा, बिहार व आता गुजरातनंतर उत्तर प्रदेश यातून हेच दिसत आहे.

काँग्रेसचा आरोपगुजरात राज्य काँग्रेसचे प्रमुख भरत सोळंकी यांनी सांगितले की, भाजपा गलिच्छ राजकारण करत आहे. पैसा आणि सत्तेच्या जोरावर ते आमच्या आमदारांना प्रलोभने दाखवीत आहेत. त्यामुळे आमचे आमदार एकजुटीने बंगळुरूला गेले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, आमदारांना पैशांच्या जिवावर शिकार करू पाहणाºया भाजपाविरुद्ध निवडणूक आयोगाने फौजदारी खटला दाखल करावा.