शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी तृणमूलमध्ये प्रवेश करणार?; ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 18:24 IST

Subramaniam Swamy : सुब्रह्मण्यम स्वामी यांनी घेतली ममता बॅनर्जी यांची भेट.

सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या (Mamata Banerjee) दिल्लीत चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. बुधवारी भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. बुधवारी दोन्ही नेत्यांनी दिल्लीतील साऊथ एव्हेन्यू या ठिकाणी भेट घेतली.

दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये २० ते २५ मिनिटं चर्चा झाली. भेटीनंतर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी टीएमसीमध्ये सामील होण्याबाबत प्रतिक्रिया दिली. मी तर यापूर्वीपासून त्यात आहे. मी तर पूर्णवेळ त्यांच्या सोबतच.. असं म्हणत यानंतर त्यांनी यावर बोलणं टाळलं. सुब्रह्मण्यम स्वामी आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.  ममता बॅनर्जींचं कौतुकभेटीनंतर स्वामी यांनी ट्विटरवरून ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं. मी जितक्याही राजकारण्यांची भेट घेतली, ज्यांच्यासोबत काम केलं, त्यापैकी ममता बॅनर्जी या जेपी, मोररजी देसाई, राजीव गांधी, चंद्रशेखर आणि पीव्ही नरसिम्हा राव यांच्यासारख्या आहेत. यांच्या बोलण्यात आणि काम करण्यात फरक नव्हता. भारतीय राजकारणात हाच एक दुर्मिळ स्वभाव आहे, असं ते म्हणाले.

भाजपवर साधला होता निशाणाकाही काळापूर्वी ममता बॅनर्जी यांचा रोम दौरा रद्द होण्यावरून स्वामी यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच त्यांना रोमला जाण्यापासून का थांबवण्यात आलं असाही सवाल केला होता. विविध मुद्द्यांवर अनेकदा स्वामी यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला होता. आर्थिक मुद्द्यांवरुनही त्यांनी प्रश्न विचारले होते.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीMamata Banerjeeममता बॅनर्जी