शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायलादेखील डोकं लागतं; स्वामींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 6:17 PM

संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारला घरचा आहेर

नवी दिल्ली: देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्यानं विरोधकांकडून वारंवार मोदी सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. एकीकडे विरोधकांकडून टीका होत असताना आता दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनीदेखील स्वपक्षावर टीकेचे बाण सोडण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीदेखील डोकं लागतं, असा टोला स्वामींनी लगावला आहे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनी अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'सामान्यपणे मंदी महागाई सोबत येत नाही. मागणीत घट झाल्यानंतर सामान्यपणे वस्तूंच्या किमती वाढत नाहीत. मात्र आता भारताच्या अर्थव्यवस्थेत या साऱ्या त्रुटी पाहायला मिळत आहेत. या प्रकारे अपयशी ठरायलादेखील डोकं लागतं', असं या परिस्थितीवर मला गमतीनं म्हणावंसं वाटतं,' असं स्वामींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

याआधी स्वामींनी डॉलरच्या तुलनेत सतत कोसळणाऱ्या रुपयावर भाष्य करताना अजब सल्ला दिला होता. भारतीय रुपयाचं मूल्य वधारण्यासाठी त्यावर लक्ष्मी मातेचं चित्र छापायला हवं, असं विधान स्वामींनी केलं होतं. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर बोलू शकतात. मात्र नोटांवर लक्ष्मी मातेचं चित्र असावं असं माझं मत आहे. तसं केल्यास भारतीय चलनाची स्थिती सुधारेल. याबद्दल कोणीही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही,' असं स्वामी म्हणाले होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीEconomyअर्थव्यवस्था