शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

भाजपाचे खासदार संवरलाल जाट यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 09:20 IST

भाजपाचे खासदार संवर लाल जाट यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

नवी दिल्ली, दि. 9 -   भाजपाचे खासदार संवरलाल जाट यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. काही दिवसांपूर्वी प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानं त्यांना एअर अॅम्ब्युलन्सनं नवी दिल्ली येथे आणण्यात आले होते. दरम्यान, 22 जुलै रोजी जयपूर येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक सुरू असतानाच खासदार संवरलाल जाट हे बेशुद्ध पडले. यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जाट यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले व ते बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना तातडीनं एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीनं नवी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. कोण होते संवरलाल जाट ?संवरलाल जाट हे अजमेरमधील खासदार होते. 9 नोव्हेंबर 2014 ते 5 जुलै 2016 पर्यंत त्यांनी मोदी सरकारमध्ये जलसंपदा मंत्री म्हणून केंद्रात कार्य केले आहे. संवरलाल यांचा जन्म 1955मध्ये राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील गोपालपुरा गावात झाला. त्यांनी वाणिज्य शाखेत पदवीधर झाल्यानंतर ते राजस्थान विद्यापिठात शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. अजमेर जिल्ह्यातील भिनाई विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 

1993, 2003 आणि 2013 मध्ये ते राजस्थान सरकारमध्ये मंत्रीदेखील होते.  2014 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्याकडे मंत्रिपद सोपवण्यात आले होते. मात्र फेरबदलानंतर त्यांच्याकडील मंत्रिपद घेण्यात आले होते.