शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

...अन्यथा मला फासावर लटकवा; साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 21:40 IST

उन्नावमधील कार्यक्रमात साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान

नवी दिल्ली: सध्या देशात राम मंदिराच्या मुद्यावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या अयोध्येला जाणार आहेत. यावर आता भाजपा खासदार साक्षी महाराज यांना भाष्य केलं आहे. अयोध्या-काशी सोडा, आधी जामा मशीद पाडा, असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. 'दिल्लीची जामा मशीद पाडा. तिथे मूर्ती सापडल्या नाहीत, तर मला फासावर लटकवा,' असंदेखील ते पुढे म्हणाले. उन्नावमधील एका कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. 'दिल्लीतली जामा मशीद पाडा. त्या मशिदीच्या पायऱ्यांखाली मूर्ती सापडतील. त्या ठिकाणी मूर्ती न सापडल्यास मला फासावर लटकवा,' असं वादग्रस्त विधान साक्षी महाराज यांनी केलं. 'मुघल काळात हिंदूंच्या भावना पायदळी तुडवण्यात आल्या. देशात मुघलांची सत्ता असताना मंदिरं पाडण्यात आली आणि त्याजागी मशिदी उभारण्यात आल्या,' असं साक्षी महाराजांनी म्हटलं. ते उन्नाव लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. साक्षी महाराज यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन सर्वोच्च न्यायालयावर शाब्दिक हल्ला चढवला. सर्वोच्च न्यायालय अनेकदा अनावश्यक प्रकरणांमध्ये निकाल देतं. मात्र अयोध्या प्रकरणात त्यांच्याकडून चालढकल सुरू आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचा निषेध करतो, असं साक्षी महाराजांनी म्हटलं. काहीही करावं लागलं तरी, २०१९ च्या निवडणुकीआधी राम मंदिराची उभारणी सुरू केली जाईल, असं साक्षी महाराज म्हणाले.  

टॅग्स :Sakshi Maharajसाक्षी महाराजBJPभाजपाRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या