शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

हेमंत करकरेंनी शिक्षकाची बोटं छाटली होती, ते देशभक्त नव्हते; साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 08:40 IST

भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.

भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हेमंत करकरे यांनी आमचे आचार्य ज्यांनी आम्हाला इयत्ता आठवीपर्यंतचं शिक्षण दिलं होतं. त्यांची बोटं करकरे यांनी छाटली होती, असा दावा साध्वींनी केला आहे. 

प्रज्ञा सिंह ठाकूर सीहोर येथे एका कार्यक्रमात बोलत होत्या. देशात एक आणबाणी १९७५ साली लागू करण्यात आली होती आणि दुसरी आणीबाणी तेव्हा लागू झाली जेव्हा २००८ साली मालेगाव बॉम्ब ब्लास्टप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला त्यांनी तुरुंगात टाकलं, असं त्या म्हणाल्या. "लोक हेमंत करकरे यांना देशभक्त मानतात पण मी तसं मानत नाही. ते देशभक्त नव्हते. देशात जे वास्तवात देशभक्त असतात त्यांना देशभक्त मानलं जात नाही", असं साध्वी म्हणाल्या. 

हेमंत करकरे देशभक्त नाहीत"ज्यांनी मला इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण दिलं त्या शिक्षकाची बोटं करकरे यांनी छाटली होती. जे लोक हेमंत करकरे यांना देशभक्त संबोधतात अशा हेमंत करकरेने लोकांच्या मनात भय निर्माण करण्यासाठी प्राध्यापक आणि शिक्षकांची बोटं छाटण्याचं काम केलं होतं. हे कुणासाठी केलं होतं? आणि ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?", असं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूर26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला