शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू; फ्लॅटमध्ये फासाला लटकलेल्या स्थितीत सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 10:35 IST

bjp mp ramswaroop sharma commits suicide: हिमाचलचे खासदार रामस्वरुप शर्मांचा मृतदेह दिल्लीतल्या फ्लॅटमध्ये सापडला; आत्महत्येचा संशय

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीतल्या आरएमएल रुग्णालयाजवळ असलेल्या खासदारांची निवासस्थानं आहेत. त्यातल्या एका फ्लॅटमध्ये शर्मा यांचा मृतदेह आढळून आला. शर्मा यांचा मृतदेह फ्लॅटमध्ये फासाला लटकलेल्या स्थितीत सापडला. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.आरएमएल रुग्णालयाजवळ असलेल्या गोमती अपार्टमेंटमध्ये (खासदार निवासस्थान) रामस्वरूप शर्मांनी आत्महत्या केल्याची माहिती दिल्ली पोलिसांना सकाळी साडे आठच्या सुमारास मिळाली. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यावेळी शर्मा यांचा मृतदेह फासाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. आत्महत्येमागचं कारण अद्याप तरी समजू शकलेलं नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.आज सकाळी शर्मा यांची खोली उघडण्यास गेलो, तेव्हा तो आतून बंद होता. वारंवार आवाज दिल्यानंतरही त्यांनी दरवाजा उघडला नाही, अशी माहिती शर्मा यांच्या कर्मचाऱ्यानं दिली. दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांना फोन केला. पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यावेळी शर्मा यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या स्थितीत दिसला, असं कर्मचाऱ्यानं सांगितलं.शर्मा यांच्या निधनामुळे भाजपनं आज होणारी संसदीय दलाची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. शर्मा हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातल्या जोगिंदरनगरचे रहिवासी होते. त्यांनी सलग दोनदा लोकसभेची निवडणूक जिंकली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. खासदार होण्याआधी त्यांनी मंडी जिल्ह्याचे भाजप सचिव आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशचे भाजप सचिव म्हणून काम केलं.  

टॅग्स :BJPभाजपा