शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराला बलात्कारप्रकरणी २५ वर्षांची शिक्षा; पीडित बहिणीसाठी भाऊ ९ वर्षे लढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 09:48 IST

धमक्यांना न घाबरता लढा देत राहिला

राजेंद्र कुमार

लखनौ : भाजपचे आमदार रामदुलार गोंड यांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून २५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. गोंड यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सोनभद्र जिल्ह्याचे विशेष न्यायाधीश  एहसानुल्लाह खान यांनी ही शिक्षा सुनावली. शिक्षेनंतर  पीडित बहिणीच्या भावाने ९ वर्षांनंतर न्याय मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. रामदुलार हे गेल्या पाच वर्षांत बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेले दुसरे भाजप आमदार आहेत.

शिक्षेनंतर मान झुकली...

खचाखच भरलेल्या कोर्टात आमदार गोंड यांना शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा त्यांची मान खाली झुकली होती आणि ते दु:खी झाले होते. दुसरीकडे, प्रदीर्घ संघर्ष आणि चढ-उतारानंतर अखेर न्याय मिळाल्याचे सांगत पीडितेच्या भावाने न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले.

आमदारकी जाणार : याबाबत अल्पवयीन मुलीच्या भावाने रामदुलार यांच्याविरुद्ध म्योरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणाची सुनावणी तब्बल ९ वर्षे न्यायालयात सुरू होती. शुक्रवारी न्यायालयाने बलात्कार प्रकरणात शिक्षा सुनावताना आमदार रामदुलार गोंड यांना तत्काळ तुरुंगात पाठविण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर आता त्यांना आमदारकी गमवावी लागणार आहे.

अखेर आज माझ्या बहिणीला न्याय मिळाला...

आमदार रामदुलार यांच्याविरोधात फिर्याद देणाऱ्या पीडित मुलीवर खटला मागे घेण्यासाठी खूप दबाव होता. मात्र, त्यांनी दबाव झुगारला. पीडितेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, बलात्काराच्या घटनेनंतर भाजपचे आमदार रामदुलार गोंड यांनी त्यांना विविध प्रकारची प्रलोभने आणि धमक्या दिल्या होत्या. मात्र, आमदाराच्या धमक्यांना तो घाबरला नाही आणि आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात लढा देत राहिला. आम्ही या निर्णयाचा आदर करतो. आज माझ्या बहिणीला न्याय मिळाला आहे, असे तो म्हणाला.