शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदार राजा सिंह यांचं मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान, संतापाची लाट, अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 09:10 IST

BJP MLA T Raja Singh: नुपूर शर्मा यांच्यानंतर आता तेलंगाणामधील भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजा सिंह यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

हैदराबाद - नुपूर शर्मा यांच्यानंतर आता तेलंगाणामधील भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजा सिंह यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. एवढंच नाही तर दबीरपुरा, भवानीनगर, रेनबाजार, मिरचौक पोलीस ठाण्यांमध्ये राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच संसप्त लोकांनी राजा सिंह यांच्याविरोधात आंदोलनही केले.

आमदार राजा सिंह यांच्याविरोधा आंदोलन करणाऱ्या लोकांनी सांगितले की, त्यांनी एका समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आमदाराविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे. राजा सिंह यांनी हल्लीच एक व्हिडीओ अपलोड केला होता. यामध्ये त्यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री पोलीस कमिश्नन सी.व्ही. आनंद यांचे कार्यालय आणि शहराच्या  इतर भागांमध्ये आंदोलन सुरू झाले. या व्हिडीओमध्ये राजा सिंह हे कॉमेडियन मुनव्वर फारुखी आणि त्याच्या आईबाबतही टिप्पणी करताना दिसत आहेत. त्यामुळे संतप्त लोकांनी आंदोलन करत त्यांच्या अटकेची मागणी केली.

टी. राजा सिंह हे हैदराबादमधील गोशामहल मतदारसंघातील आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनाही धमकी दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी त्यांना हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  

टॅग्स :BJPभाजपाTelanganaतेलंगणाPoliticsराजकारण