शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक भावना दुखावल्याबद्दल भाजपा आमदार राजा सिंह यांच्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 17:02 IST

भाजपा प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेमध्ये मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

हैदराबाद - भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपा चांगलीच अडचणीत आली आहे. जगातील इस्लामिक देशांमध्ये भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहेत. त्यातच आता भाजपा आमदारानं धार्मिक भावना दुखावल्यामुळे मंगळवारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा आमदार टी राजा यांच्यावर एका समुदायाबद्दल चिथावणीखोर विधान केल्याचा आरोप आहे. 

पोलिसांच्या तक्रारीनुसार, एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तक्रार नोंदवली आहे. त्यात भाजपा आमदार एका धार्मिक स्थळाविरोधात अपमानास्पद आणि आक्षेपार्ह विधानं करत आहेत. त्यामुळे एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यानुसार भाजपा आमदार राजा सिंह यांच्यावर कलम २९५ ए अंतर्गत गुन्हा नोंदवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

नुपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यावर कारवाईभाजपा प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेमध्ये मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. नुपूर शर्मांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, या वादापासून स्वत:ला बाजूला करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी नुपूर शर्मांविरोधात कारवाई करताना त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केलं आहे. तसेच भाजपाने मीडिया प्रभारी नवीन कुमार जिंदल यांनाही निलंबित केलं आहे.

धार्मिक मुद्द्यांवर प्रवक्त्यांसाठी भाजपच्या मार्गदर्शक सूचना भाजपाने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्ष प्रवक्त्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात विशेषत: धार्मिक भावना दुखावू नयेत, असे निर्देश दिले आहेत. भाजपच्या एक राष्ट्रीय पदाधिकाऱ्यानुसार सर्व नेते आणि प्रवक्त्यांना कठोर निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय प्रसार माध्यम विभागाच्या परवानगीशिवाय निवेदन जारी करु नये. कोणता प्रवक्ता,कोणत्या टीव्ही चॅनलवर पक्षाची बाजू मांडेल, हे भाजपची माध्यम समिती ठरविते. यासाठी त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित केल्या जातात. 

भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी एका विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर इस्लामिक देशांनी भारताविरुद्ध राजकीय स्तरावर विरोध व्यक्त केला. तसेच भारतीय उत्पादनावर बहिष्काराचे आवाहनही केले. त्या पार्श्वभूमीवर भाजपने उपरोक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

टॅग्स :BJPभाजपा