शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदाराची पोलिसाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 03:58 IST

भाजपाच्या एका आमदाराने पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस शिपायाला मारहाण केल्याच्या वृत्तामुळे पक्षात खळबळ उडाली असून, त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी केली आहे.

भोपाळ : भाजपाच्या एका आमदाराने पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस शिपायाला मारहाण केल्याच्या वृत्तामुळे पक्षात खळबळ उडाली असून, त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी केली आहे.देवास जिल्ह्यातील बागली मतदारसंघाचे आमदार चंपालाला देवडा यांच्या तसेच त्यांच्या समर्थकांच्या विरोधात पोलिसांनी सरकारी कर्मचाऱ्याला त्याचे कर्तव्य बजावण्यात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाºयास मारहाण करणे या व अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.चंपालाल देवडा यांचा मुलगा पोलीस ठाण्यात गेला होता. तिथे त्याने एका व्यक्तीच्या हातातील पाण्याची बाटली खेचून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर पोलीस शिपायाने त्याला तसे करू नये, असे सांगून, त्याला अडवले. आ. चंपालाल देवडा त्यानंतर काही वेळाने आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी सरळ त्या पोलीस शिपायाच्या कानफटात दोनदा मारले. त्या वेळी मान खाली घालून तो पोलीस शिपाई शांतपणे उभा होता.या मारहाणीचे सीसीटीव्हीमध्ये चित्रण झाले आहे. त्यामुळे आपण मारहाण केली नाही, असे सांगण्याची आ. चंपालाल देवडा यांना संधीच नाही, असे उदयनगर पोलिसांनी सांगितले. पोलीस ठाण्याचे प्रमुख शिव रघुवंशी यांनी आ. देवडा व त्यांच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा नोंदविल्याचे मान्य केले. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :BJPभाजपाnewsबातम्या