शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न विचारल्याने भाजप आमदार भडकले; महिलेला केली शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 15:06 IST

Karnataka BJP MLA : भाजप आमदार अरविंद लिंबावली यांचा एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते महिलेला शिवीगाळ करत तिच्याकडून कागद फाडताना दिसत आहेत.

बंगळुरू : कर्नाटकमध्ये भाजप आमदाराचे एका महिलेसोबत गैरवर्तन समोर आले आहे. आमदार अरविंद लिंबवली यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ करत गैरवर्तन केले. दरम्यान, मुसळधार पावसानंतर बंगळुरूच्या वरथूरमध्ये पीडित महिलेने आमदाराला तक्रार पत्र देण्याचा आणि काही समस्यांबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भाजप आमदार अरविंद लिंबवली संतप्त झाले. 

भाजप आमदार अरविंद लिंबावली यांचा एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते महिलेला शिवीगाळ करत तिच्याकडून कागद फाडताना दिसत आहेत. महादेवपुरा येथील भाजप आमदारापर्यंत काहीतरी सांगण्यासाठी ही महिला पोहोचली होती. मात्र अरविंद लिंबावली तिच्यावर चिडले. त्या महिलेच्या हातात एक कागद होता आणि तो आमदाराला दाखवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र आमदाराने तो हिसकावून फाडला. यानंतर त्यांनी पोलिसांना महिलेला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

यापूर्वी, भाजप आमदाराने आपल्या मुलीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत पोलिसांशी गैरवर्तन केले होते. याप्रकरणी भाजप आमदाराने माफी मागितली होती. मात्र आता याच आमदाराने एका महिलेसोबत गैरवर्तन केले आहे. दरम्यान, नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून नेहमीच संयम आणि सौजन्याने वागणे अपेक्षित असते, परंतु अनेक प्रसंगी ते मर्यादा तोडून जनतेशी गैरवर्तन करतात. कधी लोकप्रतिनिधींनी जनतेशी तर कधी अधिकार्‍यांशी गैरवर्तन केल्याची अशी अनेक प्रकरणे देशभरात घडली आहेत.

टॅग्स :BJPभाजपाKarnatakकर्नाटक