शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्या घरासाठी भाजपा आमदाराने अधिकाऱ्याला केली होती बॅटने मारहाण, त्यावर आता बुलडोझर चालणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 16:07 IST

जुने घर तोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याने भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती.

इंदूर - जुने घर तोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याने भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. मात्र जे घर वाचवण्यासाठी आकाश विजयवर्गीय यांनी एवढा आटापिटा केला होता त्या घरावर आता बुलडोझर चालणार आहे. आकाश यांनी पाडकामास विरोध केलेले हे जुनाट घर इंदूर महापालिका मंगळवारी पाडणार आहे.  26 जून रोजी इंदूर पालिकेचे अधिकारी सदर जुनाट घर तोडण्यासाठी आले होते. मात्र भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांनी संबंधित आमदारांना मारहाण केली होती. तसेच या अधिकाऱ्यांवर विजयवर्गीय यांनी बॅटही उगारही होती. विजयवर्गी यांच्या या दंडेलशाहीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यावर आकाश यांच्यावर जोरदार टीका झाली होती. दरम्यान, जे जीर्ण घर वाचवण्यासाठी आकाश विजयवर्गीय यांनी एवढा आटापिटा केला त्या घरावर आता बुलडोझर चालणार असून, इंदूर महानगरपालिका मंगळवारी या घरावर कारवाई करणार आहे. हे घर पाडण्यासाठी रविवारी कारवाई करण्यात येणार होती. मात्र पुरेसा पोलीस फाटा न मिळाल्याने ही कारवाई पुढे ढकलावी लागली होती. दरम्यान, आकाश विजयवर्गीय यांनी अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीबाबत आपल्याला पश्चाताप होत नसल्याचे म्हटले आहे. मात्र यापुढे महात्मा गांधींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गानं चालण्याचा प्रयत्न करणार असल्याचेदेखील विजयवर्गीय  यांनी सांगितले. इंदूर महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण केल्या प्रकरणी आकाश यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. न्यायालयानं शनिवारी त्यांच्या सुटकेचे आदेश दिले.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा