शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

होळी-दिवाळीला DJ बंद करता मग मशिदीवरील भोंगे का उतरवायचे नाहीत?; भाजपा मंत्र्याचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 15:06 IST

मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेते आणि बिहार सरकारमधील खाणकाम मंत्री जनक राम यांनी या मुद्द्यावर भाष्य करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

मुझफ्फरपुर-

मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेते आणि बिहार सरकारमधील खाणकाम मंत्री जनक राम यांनी या मुद्द्यावर भाष्य करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मशिदीत लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदी घातली पाहिजे. ही जनभावना असून, लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या मनाची गोष्ट मी बोलून दाखवत आहे, असं जनक राम म्हणाले. 

"होळी, दिवाळी आणि छठ हे महत्वाचे सण मानले जातात. यामध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजला की तो बंद केला जातो. मग मशिदीत मोठ्याने लाऊडस्पीकर वाजवण्यावर बंदी का घालू नये. मला हे थांबवायला आवडेल. राज्यघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करून तुम्ही एखाद्या वर्गावर बंदी घालता तेव्हा मशिदीवरही बंदी घातली पाहिजे", असे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना होतो त्रासमशिदींवरील भोंगे उतरवले जावेत ही जनतेची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. जेव्हा मशिदीत मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवला जातो, तेव्हा जवळपास शिकणाऱ्या मुलांची अडचण होते. तिथे राहणारे लोक, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, त्यांच्या समस्या आहेत. जनतेचा आवाज दाबला गेली की जनताच आवाज उठवते. लोकप्रतिनिधी आणि मंत्री या नात्याने आम्ही हा मुद्दा ठेवला आहे. प्रत्येक समाजातील प्रत्येक धर्मावर बंदी असताना त्यावरही बंदी घातली पाहिजे, असं जनक राम म्हणाले. 

विधानसभेत यासंदर्भात कुणी सवाल उपस्थित केला तर आम्ही त्यास उत्तर देण्याचे काम करू असंही ते म्हणाले. राज्यातील मशिदीत लाऊडस्पीकर लावण्याचा मुद्दा वेळोवेळी गाजत असतो. त्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. मंत्र्याच्या या विधानाने पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणात खळबळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहार