शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महुआ मोइत्रांविरोधात भाजपकडून तक्रार, माँ कालीबाबत केलेल्या वक्तव्यासाठी केली अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 13:49 IST

Kaali Documentary : टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांना तात्काळ अटक करण्यासाठी भाजपनं तक्रार दाखल केली आहे.

'काली' या माहितीपटाचे (डॉक्युमेंट्री फिल्म) पोस्टर आणि टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यावरून वाद अजूनच वाढत आहे. भाजपने पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष टीएमसीवर माँ कालीचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. तसंच टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांना तात्काळ अटक करण्यासाठी भाजपनं तक्रार दाखल केली आहे.वास्तविक, महुआ मोइत्रा मंगळवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्ट 2022 मध्ये सहभागी झाली होत्या. यादरम्यान त्यांनी कालीच्या पोस्टरवरून सुरू असलेल्या वादावर म्हटलं होतं की, माँ कालीची अनेक रूपं आहेत. माझ्यासाठी काली म्हणजे मांस आणि वाइन स्वीकारणारी देवी. मात्र, टीएमसीने या विधानापासून दूर राहून त्याचा निषेध केला.महुआ यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर बंगाल भाजपने विरोध दर्शवला आहे. भाजप नेते राजर्षी लाहिरी यांनी कोलकाता येथील रवींद्र सरोबार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महुआ मोईत्रा यांनी एका कार्यक्रमात माँ कालीबाबत काली ही देवी आहे जी मांस आणि मद्य स्वीकारते. मोइत्रा यांनी जाणूनबुजून आमच्या धर्म आणि धार्मिक श्रद्धेबाबत हे विधान केले आहे.

'काली' चित्रपटावर गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, मध्य प्रदेशात निर्मात्याविरोधात FIR होणारकालीदेवीचा अपमान करण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य करण्यात आल्याचे भाजप नेत्याने तक्रारीत म्हटले आहे. सध्या पश्चिम बंगाल राज्यात सर्वत्र जातीय हिंसाचार सुरू असून मालमत्तेची नासधूस केली जात आहे. पोलीस योग्य पद्धतीने काम करत नाहीत. अशा परिस्थितीत महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे तक्रारीत म्हटले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही. महुआ मोईत्रा यांचे विधान धर्माच्या आधारावर विविध गटांमधील शत्रुत्वाला चालना देते. अशा प्रकरणात महुआविरुद्ध भादंवि कलम 153A आणि 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्याने केली आहे. 

टॅग्स :Member of parliamentखासदारwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाArrestअटक