शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला आघाडी

By बाळकृष्ण परब | Updated: November 10, 2020 10:28 IST

bypoll result news : मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील पोटनिवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने आघाडी मिळवली आहे.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निडणुकीप्रमाणेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि इतर राज्यांमधील पोटनिवडणुकांच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. यामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील पोटनिवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने आघाडी मिळवली आहे.मध्य प्रदेशमध्ये २८ जागांवर पोटनिवडणूक होत असून, येथील २२ मतदारसंघांमधील कल समोर आले आहेत. यामध्ये भाजपाने १८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर८ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे इतर पक्ष दोन जागांवर आघाडीवर. मध्य प्रदेशमध्ये सरकार टिकवण्यासाठी भाजपाला किमान ९ ते १० जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. तर काँग्रेसला २८ पैकी २८ जागा जिंकणे आवश्यक आहे.उत्तर प्रदेशमध्येही ७ जागांवर पोटनिवडणूक झाली होती तिची मतमोजणी सुरू असून, यामध्ये भाजपा ४ आणि सपा बसपा प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. गुजरातमध्ये आठ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सात जागांवर भाजपा आघाडीवर आहे तर एका जागेवर काँग्रेसला आघाडी मिळाली आहे.इतर राज्यांच्या विचार केल्यास कर्नाटकमध्ये दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर जागेवर भाजपा आघाडीवर आहे. झारखंडमध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक होत असून, येथील मतमोजणीत एका ठिकाणी भाजपा आणि एका ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेशUttar Pradeshउत्तर प्रदेशGujaratगुजरात