शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींवर बोट रोखाल, तर हातच तोडून टाकू, भाजपा नेत्याचे वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 04:17 IST

नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड दिले. ही बाब प्रत्येकासाठी अभिमानाची असली पाहिजे.

पाटणा : नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड दिले. ही बाब प्रत्येकासाठी अभिमानाची असली पाहिजे. त्यामुळे त्यांच्यावर जर कोणी बोट रोखले किंवा हात दाखवला तर ते बोट किंवा हातच छाटून टाकू, असे धक्कादायक वक्तव्य बिहार भाजपाचे अध्यक्ष व उजियारपूरचे खासदार नित्यानंद राय यांनी केले. या प्रकरणाची भाजपाने गंभीर दखल घेतली असून, नेत्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.वैश्य आणि कनू (ओबीसी) समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते सोमवारी बोलत होते. अतिशय सामान्य परिस्थितीतून पंतप्रधान बनण्यापर्यंतच्या मोदी यांच्या प्रवासाचा उल्लेख करून राय म्हणाले की, त्या परिस्थितीतून बाहेर पडून ते पंतप्रधान बनले आहेत. गरिबाचा मुलगा, प्रत्येकाला त्याचा अभिमान असला पाहिजे. त्यामुळेच मोदी यांच्या दिशेने दाखवले जाणारे बोट, दाखवला जाणारा हात आम्ही सगळे मिळून एकतर तोडून टाकू वा गरज भासली तर छाटूनच टाकू. (वृत्तसंस्था)>..नंतर अपेक्षित माघारया वेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुशील मोदी उपस्थित होते. राय यांच्याशी या वक्तव्याविषयी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी बोटे तोडण्याची किंवा हात मोडण्याची भाषा वापरली ती देशाचा अभिमान व सुरक्षेविरोधात जर कोणी बोलले तर त्याला योग्य तो संदेश देण्यासाठीच. माझे विधान हे कोणा व्यक्तीला वा विरोधी पक्षांना लक्ष्य करून नव्हते.>संयमित भाषा वापरण्याचे नेत्यांना देणार प्रशिक्षणसर्वच नेत्यांच्या एकूणच वर्तनात शिस्त आणण्यासाठी भाजपा नेत्यांना संयमित भाषा वापरण्याचे प्रशिक्षण देणार आहे. राय यांनी नंतर वक्तव्य मागे घेतले असले तरी यावरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. भाजपाला एखाद्या नेत्याच्या वक्तव्यावरून मागे हटावे लागण्याची ही पहिली वेळ नाही. त्यामुळेच नेत्यांना संयमित भाषेचा वापर शिकविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यामुळे नेत्यांना असे बॅकफूटवर यावे लागणार नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017