शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्याच्या मुलाने वर्णिकाच्या गाडीचा पाठलाग केल्याची कबुली दिली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 11:48 IST

हरयाणातील भाजपाचे वजनदार नेते सुभाष बराला यांचा मुलगा विकास बरालाने (23) पोलीस चौकशीत वर्णिका कुंडूच्या गाठीचा पाठलाग केल्याची कबुली दिली आहे.

ठळक मुद्दे शुक्रवारी रात्री विकास बराला आणि त्याचा मित्र आशिषने काही किलोमीटर अंतरापर्यंत वर्णिकाच्या गाडीचा पाठलाग केला होता. तिने फेसबुकवर या थरारक घटनेची पोस्ट लिहील्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

चंदीगड, दि. 10 - हरयाणातील भाजपाचे वजनदार नेते सुभाष बराला यांचा मुलगा विकास बरालाने (23) पोलीस चौकशीत वर्णिका कुंडूच्या गाठीचा पाठलाग केल्याची कबुली दिली आहे. एनडीटीव्ही वाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. सध्या संपूर्ण देशभरात हे प्रकरण गाजत असून, भाजपावर आपल्या नेत्याला पाठिशी घालण्याचा आरोप होत आहे. 

मागच्या आठवडयात शुक्रवारी रात्री विकास बराला आणि त्याचा मित्र आशिषने काही किलोमीटर अंतरापर्यंत वर्णिकाच्या गाडीचा पाठलाग केला होता. वर्णिका एका आयएएस अधिका-याची मुलगी असून, तिने फेसबुकवर या थरारक घटनेची पोस्ट लिहील्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.  पोलिसांनी बुधवारी विकास बराला आणि त्याच्या मित्राला अटक केली. त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. याआधीही विकासला अटक केली होती. मात्र त्यांच्यावर गुन्हा नोंद केला नसल्याने न्यायालयात हजर न करताच जामीन मंजूर करण्यात आला होता.

विकासचे वडिल आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष सुभाष बरला यांनी यासंबंधी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपला मुलगा विकास पोलिसांना तपासात संपुर्ण सहकार्य करेल, तसंच दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. पत्रकार परिषद सुरु असतानाच मुलगा विकासचा फोन आल्याने सुभाष बराला पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून निघून गेले. 

पत्रकार परिषदेदरम्यान सुभाष बराला यांनी सांगितलं की, 'आम्ही याप्रकरणी कोणतंही राजकारण केलं नसून, कोणताही दबाव टाकलेला नाही. जे आरोप लावण्यात येतील त्यानुसार कारवाई होईल. वर्णिका मुंडू माझ्या मुलीसारखी आहे. जर माझा मुलगा दोषी आढळला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पोलिसांकडून कोणताही निष्काळजीपणा केला जात नसून योग्य कारवाई केली जात आहे'. 

काय आहे प्रकरण -हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याच्यावर एका मुलीचा पाठलाग व छेडछाड केल्याचा आरोप आहे. प्रदेशाध्यक्षांचा मुलगा कायद्याचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी आयएएस अधिका-याची मुलगी आहे. शुक्रवारी चंदीगडमधील सेक्टर 9 येथून चालली होती. तेव्हा एक टाटा सफारी कार पाठलाग करीत आहे, असे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी दोघांना अटक केली, तेव्हा ते दोघेही दारूच्या नशेमध्ये होते. हरिणाया भाजपाध्यक्ष सुभाष बराला यांनी दिल्लीतल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं.