शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पाच गुन्हे दाखल असोत, पण जिंकणाराच उमेदवार हवाय; BJPनं कमलनाथांचा व्हिडीओ केला ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 10:36 IST

मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं येथील राजकारण तापलं आहे. भाजपाकडून कमलनाथ यांचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.

भोपाळ - मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं येथील राजकारण तापलं आहे. भाजपाकडून कमलनाथ यांचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. 'उमेदवारावर एक गुन्हा दाखल असो किंवा पाच, पण आपल्याला जिंकणाराच उमेदवार हवाय', असे वक्तव्य करताना कमलनाथ या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

या व्हिडीओवरुन भाजपा आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि भाजपा नेत्यांनी कमलनाथ यांच्यासहीत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. कमलनाथ यांचा संबंधित व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये कमलनाथ तिकीट वाटपासंदर्भात उपस्थितांसोबत बोलताना दिसत आहेत. 'उमेदवारावर एक गुन्हा दाखल असो किंवा पाच, पण मला जिंकणाराचा उमेदवार हवाय', असे बोलताना कमलनाथ या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. 

हा व्हिडीओ शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. 'जर हेच काँग्रेसचे राजकारण असेल तर... जनता समजुतदार आहे... 28 नोव्हेंबरला कोणाला मतदान करुन विजयी करायचे, याचा निर्णय जनताच घेईल'.

व्हिडीओमध्ये छेडछाड - काँग्रेसकमलनाथ यांच्या मूळ व्हिडीओसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी शिवराजसिंह चौहान यांना प्रत्युत्तर दिले आे. ''शिवराजसिंह चौहान आता आपली पत राखण्यासाठी या छेडछाड केलेल्या व्हिडीओचा आाधार घेणार आहेत?, एडिट केलेल्या या व्हिडीओला जनता 28 नोब्हेंबरला उत्तर देईल'', असे रिट्विट ओझा यांनी केले आहे.

शिवाय, शिवराजसिंह चौहान यांच्या ट्विटची तक्रार निवडणूक आयोगात करणार असल्याचंही ओझा यांनी सांगितले. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहान