शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! बंगालमध्ये बॉम्ब, गोळीबार...; भाजपा नेत्यावर झालेल्या हल्ल्याचा २५ सेकंदाचा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 13:14 IST

भाजपा नेत्यावर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जी सरकारच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी केलेल्या नबन्ना अभियानावर पोलिसांनी बळाचा वापर केला. त्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने आज १२ तासांसाठी बंगाल बंद करण्यात आला आहे. याच दरम्यान स्थानिक भाजपा नेत्यावर हल्ला करण्यात आला.

भाजपा नेत्यावर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अज्ञात व्यक्ती स्थानिक भाजपा नेते प्रियांगू पांडे यांच्या कारवर गोळीबार करत असल्याचं दिसत आहे. हल्लेखोराने पांडे यांच्या गाडीवर गोळीबार केला. या गोळीबारात कारची काच फुटून गोळी चालकाला लागली. या हल्ल्यात प्रियांगू हे देखील जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एकूण दोन जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या हल्ल्यानंतर भाजपाचे नेते शुभेंदू अधिकारी म्हणाले की, "टीएमसीच्या गुंडांनी भाजपा नेत्याच्या वाहनावर गोळीबार केला. वाहन चालकाला गोळी लागली आहे. अशा प्रकारे ममता बॅनर्जी आणि टीएमसी भाजपाला रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. बंद यशस्वी झाला असून लोकांनी याचे मनापासून स्वागत केले आहे. पोलीस आणि टीएमसी यापुढे भाजपाला घाबरवू शकणार नाही."

भाजपाचे नेते अर्जुन सिंह यांनी या संपूर्ण घटनेचा खुलासा करताना प्रियांगु पांडे आमच्या पक्षाचे नेते असल्याचं सांगितलं. ते गाडीने येत होते. गाडी येताच बॉम्बस्फोट झाला. वाहन न थांबल्याने गोळ्या झाडण्यात आल्या. चालकाच्या डोक्याला गोळी लागली. गोळी लागल्याने तो खाली पडला. अनेक गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. एसीपींच्या उपस्थितीत हा प्रकार घडला असं म्हटलं आहे. 

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी