अहमदाबाद - भाजपाच्या एका स्थानिक नेत्याने पक्षाच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर एकामागोमाग एक पॉर्न व्हिडिओ पोस्ट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गौतम पटेल असं या नेत्याचं नाव असून ते भाजपाच्या नरोदा युनिटचे सचिव आहेत. “नरोदा १२ (मोदी फिर से)” या ग्रुपवर गौतम पटेल यांनी ७० हून अधिक पॉर्न व्हिडिओ पोस्ट केले. यामुळे लज्जेखातर काही महिला ग्रुप मेम्बर्सनी ग्रुप देखील सोडून दिला. या सर्व प्रकारामुळे भाजपाची अहमदाबादमध्ये नाचक्की झाली आहे. भाजपाच्या या व्हॉट्स अॅप ग्रुपमधील काही कार्यकर्त्यांसह महिला नगरसेविकांचाही समावेश आहे. गौतम पटेल यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेक पदाधिकारी या ग्रुपमधून बाहेर पडले. भाजपा कार्यकर्त्यांनी या प्रकराची भाजपा शहर अध्यक्ष जगदीश पांचाळ आणि अहमदाबाद जिल्ह्याचे प्रमुख आय.के.जाडेजा यांच्याकडे तक्रार केली आहे. माझा फोन हरवला असून काही अज्ञात व्यक्तींनी माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने पक्षाच्या ग्रुपमध्ये हे व्हिडिओ पाठवले असा गौतम पटेल यांनी आरोपाचे खंडन केले आहे.
भाजपा नेत्याचा प्रताप, पक्षाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पॉर्न व्हिडिओंची बरसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 18:46 IST
या सर्व प्रकारामुळे भाजपाची अहमदाबादमध्ये नाचक्की झाली आहे.
भाजपा नेत्याचा प्रताप, पक्षाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पॉर्न व्हिडिओंची बरसात
ठळक मुद्दे“नरोदा १२ (मोदी फिर से)” या ग्रुपवर गौतम पटेल यांनी ७० हून अधिक पॉर्न व्हिडिओ पोस्ट केले. काही अज्ञात व्यक्तींनी माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने पक्षाच्या ग्रुपमध्ये हे व्हिडिओ पाठवले असा गौतम पटेल यांनी आरोपाचे खंडन केले आहे.