शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

“CM उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करावी”; किरीट सोमय्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 15:43 IST

उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालिसाने उत्तर देण्याच्या केलेल्या आवाहनानंतर त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. हनुमान चालिसेचा मुद्दा राज्यातील राजकारणात चांगलाच तापताना दिसत आहे. यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर (Maha Vikas Aghadi) निशाणा साधला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल, तर हनुमान चालिसा, रामभक्त हनुमंतांचे कीर्तन भजन बंद करून दाखवा, असा थेट इशारा दिला आहे. 

किरीट सोमय्या यांनी दिल्लीत नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राणा दाम्पत्यांनी दिल्लीत जाऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर आता किरीट सोमय्या यांनी टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकारला कोर्टाच्या एवढ्या चपराक पडल्यात की, उद्धव ठाकरेंचे गाल सुजले आहेत. पोलीस प्रशासनाचा वापर सरकार माफियाप्रमाणे करत आहे. हा चिंतेचाच विषय आहे. माफियांना आम्ही ठिकाणावर आणणार असल्याचे एल्गार किरीट सोमय्या यांनी केला. 

उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करा

ठाकरे सरकारने हद्द केली आहे. खासदार आणि आमदारांना धमकी घेतात. वीस फुट खड्ड्यात गाढण्याची भाषा फक्त माफिया सरकार करू शकते. लोकसभा अध्यक्षांना भेटून ठाकरे सरकारच्या या माफियागिरीबद्दल तक्रार करणार आहे. गृहसचिवांचीही भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत, असे ठणकावून सांगितले. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, हिंदुस्थानचे कोट्यवधी लोक हनुमानाची पूजा करतात. आम्ही हनुमान भक्त आहोत. जेव्हा रावण जन्माला येतात, त्यांच्या लंकेला हनुमानच जाळून टाकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हनुमान चालिसा, हनुमानाचे भजन-कीर्तन बंद करून दाखवावे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. 

दरम्यान, शिवसेनेच्यावतीने येत्या १४ मे रोजी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी नवी दिल्लीत महाराष्ट्र सरकार विरोधात आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदबुद्धी द्यावी, यासाठी नवी दिल्लीतील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम करणा आहोत, असे रवी राणा यांनी जाहीर केले आहे. तुम्ही सभेत आम्ही मर्द आहोत. मर्दासारखे काम करतो असे वारंवार म्हणता. पण तुम्ही एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकून तिला चुकीची वागणूक देऊन तुमचा नामर्दपणा दाखवून दिला आहे. तुम्ही जेव्हा भाजपाशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात त्याच दिवशी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली. तुम्ही त्याच दिवशी सर्व शिवसैनिकांना पोरके केले, अशी घणाघाती टीका रवी राणा यांनी केली.  

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवि राणाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी