शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

हरियाणात भाजपा नेत्याची मुजोरी; अॅम्ब्युलन्स रोखल्याने रूग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 14:40 IST

हरियाणामध्ये भाजपाच्या नेत्याच्या मुजोरीचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.

ठळक मुद्दे हरियाणामध्ये भाजपाच्या नेत्याच्या मुजोरीचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.हरियाणातील भाजपाचे नेते दर्शन नागपाल यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. अॅम्ब्युलन्स रोखल्याने त्या रूग्णाला वेळेवर उपचार मिळाले नसल्याने त्या रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

चंदीगड, दि. 7- हरियाणामध्ये भाजपाच्या नेत्याच्या मुजोरीचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला यांनी एका मुलीची छेड काढल्याचा प्रकरण ताज असताना भाजप नेत्याच्या मुजोरीमुळे एका रूग्णाचा जीव गेल्याची घटना घडली आहे.  हरियाणातील भाजपाचे नेते दर्शन नागपाल यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. एका अॅम्ब्युलन्सचा त्यांच्या गाडीला धक्का लागल्याने त्यांनी ती अॅम्ब्युलन्स रोखून धरली. त्या अॅम्ब्युलन्समध्ये एक रूग्ण होता. अॅम्ब्युलन्स रोखल्याने त्या रूग्णाला वेळेवर उपचार मिळाले नसल्याने त्या रूग्णाचा मृत्यू झाला आहे. भाजपाचे नेते दर्शन नागपाल यांनी तब्बल आर्धा तास अॅम्ब्युलन्स रोखून धरली होती. या प्रकरणी दर्शन नागपाल याच्या विरोधात पीडित रूग्णाच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान. या प्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे. भाजपा नेत्याच्या मुजोरीचं गेल्या दोन दिवसातील हे दुसरं प्रकरण आहे. द

र्शन नागपाल हे हरिणायातील फतेहाबादमधील नगरसेवक आहेत. पीडित रूग्णाच्या कुटुंबियांनी केलेले सगळे आरोप दर्शन नागपाल यांनी फेटाळून लावले आहेत. शनिवारी संध्याकाळी चंदीगडमधील फतेहबाद भागात दर्शन नागपाल यांच्या गाडीला एका अॅम्ब्युलन्सची धडक बसली. रस्त्यावर जास्त ट्राफीक असल्याने धडक बसल्याची माहिती मिळते आहे. अॅम्ब्युलन्सची धडक लागल्याने दर्शन नागपाल यांनी अॅम्ब्युलन्सला पाठलाग केला आणि नंतर अॅम्ब्युलन्सचा रस्ता रोखून धरला. आर्ध्या तास त्यांनी अॅम्ब्युलन्स पुढे जाऊ दिली नाही. असं पीडित रूग्णाचे नातेवाईक सिताराम सोनी, अरूण सोनी यांनी तक्रारीत म्हंटलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर अॅम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तेथे 42 वर्षीय नवीन सोनी यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

पण पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांनी केलेले सगळे आरोप दर्शन नागपाल यांनी फेटाळून लावले आहेत. कारला धडक होऊनही मी अॅम्ब्युलन्सला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं होतं. त्यामुळे मी अॅम्ब्युलन्स रोखली असा प्रश्चच नाही. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना विचारा, असं नागपाल म्हणाले आहेत. भाजपाच्या नेत्याविरूद्ध तक्रार आली असल्यातं, वरिष्ठ पोलीस अधिकारी जगदीश चंद्रा म्हणाले आहेत. तसंच दोन्हीही पक्षांना चौकशीसाठी बोलविण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

भाजपा नेत्याच्या मुलाने काढली मुलीची छेडहरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलावर पाठलाग आणि छेडछाड केल्याचा आरोप आहे. महत्त्वाचं म्हणजे या गंभीर गुन्ह्यातही त्याला सहजरित्या जामीन मिळाला आहे. हरियाणा भाजपचे अध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकासला छेडछाडीच्या आरोपात अटक करण्यात आली होती. हरियाणामध्ये आयएएस अधिकारी विरेंदर कुंडू यांची मुलगी वर्णिकाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलावर विकासवर छेडछाडीचा आरोप केला आहे. तरुणीच्या आरोपानुसार, विकास बराला आणि त्याचा मित्र आशिष कुमार एका पेट्रोल पंपापासूनच तिच्या कारचा पाठलाग करत होते आणि कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रसंगावधान दाखवत पोलिसांना फोन केला. घटनास्थळी पोहोचलेल्या दोन जणांना अटक केली. यानंतर तरुणीने फेसबुकवर पोस्ट लिहिली. मी सुदैवी आहे की बलात्कारानंतर मी नाल्यात सापडले नाही,” असं तिने लिहिलं आहे.